एमआयएम, मनसे आम्हांला नको : अशोक चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 05:35 PM2019-02-08T17:35:14+5:302019-02-08T17:55:44+5:30

आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी व अन्य पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे,

MIM, MNS does not want us : Ashok Chavan | एमआयएम, मनसे आम्हांला नको : अशोक चव्हाण 

एमआयएम, मनसे आम्हांला नको : अशोक चव्हाण 

Next
ठळक मुद्देमित्र पक्षांकडूनही एमआयएम किंवा मनसे यांना नको पुण्यात काँग्रेसच्या जनसंघर्ष सभेपुर्वी पत्रकार परिषद शेतकऱ्यांना पुन्हा संप करण्याची वेळ येते हे दुर्दैवदुष्काळाची घोषणा फक्त कागदावरच

पुणे: आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी व अन्य पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे. मात्र, आम्हांला एमआयएम किंवा मनसे यांपैकी कोणीही नको आहे. आमच्या मित्र पक्षाकडूनही त्यांच्यासाठी नकारच आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत ते म्हणाले, ते आले तर आनंदच होईल मात्र त्यांना एमआयएमची साथ सोडावी लागेल  
पुण्यात काँग्रेसच्या जनसंघर्ष सभेपुर्वीच्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, पुण्याची जागा आमचीच आहे, ती आम्ही लढवू. निवडून येण्याची क्षमता हीच गुणवत्ता आहे, निवडणूक आयोगाने दिलेला खर्च करण्याची क्षमता हाही निकष आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क सांगितला असला तरी आम्हीही आग्रही आहोत. 
पुण्याची जागा लढवण्यावर ते म्हणाले की, पुण्याची जागा आमचीच आहे, ती आम्ही लढवू, निवडून येण्याची क्षमता हीच गुणवत्ता आहे. निवडणूक आयोगाने दिलेला खर्च करण्याची क्षमता हाही निकष आहे असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क सांगितला असला तरी आम्हीही आग्रही आहोत.
मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता. शेतकऱ्यांना पुन्हा संप करण्याची वेळ येते हे दुर्दैव.दोन वर्षांनंतरही कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. दुष्काळाची घोषणा फक्त कागदावरच आहे. विद्यार्थ्यांची फी माफी, चारा यापैकी कोणत्याही उपाययोजना प्रत्यक्ष कार्यरत नाहीत.मुख्यमंत्री फक्त क्रिकेटमध्ये मग्न आहेत. पंतप्रधानांनी स्वतः म्हटलंय लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचं मत पंतप्रधानांच्या मतापेक्षा वेगळं आहे असं म्हणावं लागेल.

राहूल गांधी मराठवाड्यातील नांदेडमधुन लढणार ही चर्चा कुठुन सुरू झाली माहिती नाही. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील कुठल्याही मतदारसंघातुन निवडून येऊ शकतात. पण ते नांदेडमधुन निवडणूक लढवणार याबाबत मला तरी काही माहिती नाही.

Web Title: MIM, MNS does not want us : Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.