भाजपातही me too? महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग : पुरुष पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 22:47 IST2018-10-29T22:45:46+5:302018-10-29T22:47:17+5:30
पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजपाच्याच पुरुष पदाधिकाऱ्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपातही me too? महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग : पुरुष पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजपाच्याच पुरुष पदाधिकाऱ्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद देशमाने (रा. वेल्हा,भोर) असे आरोपीचे नाव असू तो भाजापाचा पदाधिकारी आहे. तीन वर्षापुर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात देशमाने व फिर्यादी महिलेची ओळख झाली होती. त्यावेळी त्यावेळी त्याने मोबाईल क्रमांक घेतला होता. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून देशमाने हा वारंवार महिलेला मोबाईलवर मेसेज करीत होता. मात्र, त्यास फिर्यादी महिलेने कसलाही रिप्लाय दिला नाही. दरम्यान, रविवारी पुन्हा त्याने मसेज केला. तसेच अश्लील व्हिडिओ पाठविला. यामुळे त्रस्त झालेल्या महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार विनयभंग व माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत देशमाने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या देशभर मीटूचे प्रकरण चर्चेत आहेत. राजकीय, सिनेसृष्टी, प्रशासन अशा विविध क्षेत्रातील अनेक प्रकरण बाहेर येत आहेत. अशातच पिंपरी- चिंचवडमध्ये भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.