शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या लेखी आमदार-खासदार ‘गरीब’!

By admin | Updated: May 6, 2015 02:23 IST

आजी-माजी आमदार, खासदारांच्या कोट्यवधीच्या संपत्तीची चर्चा उघडपणे होत असली तरी म्हाडाला वाटते की अद्यापही हे लोकप्रतिनिधींचे मासिक उत्पन्न अत्यल्प आणि अल्प आहे.

जमीर काझी, मुंबई आजी-माजी आमदार, खासदारांच्या कोट्यवधीच्या संपत्तीची चर्चा उघडपणे होत असली तरी म्हाडाला वाटते की अद्यापही हे लोकप्रतिनिधींचे मासिक उत्पन्न अत्यल्प आणि अल्प आहे. त्यामुळे यंदाच्या घरांच्या लॉटरीमध्ये त्यांच्यासाठी या उत्पन्न गटातील तब्बल १४ सदनिका राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे माजी आमदाराला दरमहा राज्य सरकारकडून ४० तर विद्यमान आमदाराला ७० हजार मानधन मिळते़ त्यामुळे अत्यल्प गटात अर्जासाठी पात्रही ठरत नाहीत. त्यामुळे अनेक वर्षांपासून त्यासाठी कोणी अर्जही करीत नसताना दोन टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. पात्रतेअभावी पडून राहणारी ही घरे सर्वसामान्यांच्या कोट्यात वर्ग केल्यास गरजूंना त्याचा लाभ होऊ शकतो. म्हाडाच्यावतीने येत्या ३१ मे रोजी मुंबईतील विविध ठिकाणची ९९७ आणि अंध व अपंगांच्या प्रवर्गातील राखीव ६६ घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यापैकी मुंबईतील मध्यम, अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील एकूण ९९७ घरांपैकी दोन टक्के कोट्याप्रमाणे २० घरे आजी -माजी लोकप्रतिनिधींसाठी राखीव ठेवलेली आहेत. त्यामध्ये राज्यातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे संसदेचे आजी-माजी खासदार आणि विधानसभा व विधान परिषदेचे आजी -माजी आमदार पात्र ठरतात. मात्र त्यासाठी नमूद केलेल्या उत्पन्न गटाइतके मासिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. अत्यल्प उत्पन्न गटाची मर्यादा १६ हजार तर अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अनुक्रमे ४० व ७० हजार कौटुंबिक मासिक उत्पन्न असण्याची अट आहे. मात्र माजी आमदारांना राज्य शासनाकडून सरासरी ४० हजार रुपये पेन्शन तसेच अन्य भत्ते व सवलतीही दिल्या जातात. त्याशिवाय बहुतेकांचे उपजीविकेसाठी ज्ञात उत्पन्नाचे अनेक मार्गही असतात. त्यामुळे बहुतेक आजी - माजी लोकप्रतिनिधी अत्यल्प व अल्प गटाच्या कक्षेत येत नाहीत. तरीही म्हाडाने पूर्वीप्रमाणे या दोन गटांतील १४ घरे त्यांना राखीव ठेवलेली आहेत. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचे अपुऱ्या घरामुळे हाल होत आहेत़ त्यामुळे ही अत्यल्प आणि अल्प उत्पन्नाच्या निकषात न बसणारे ही घरे त्यांच्याकडे वर्ग करण्याची आवश्यकता आहे़ त्याबाबत यापूर्वी मागणीही करण्यात येऊन म्हाडाने त्याकडे कानाडोळा केला आहे.तरीही निर्णय नाहीच !च्म्हाडाच्या घराच्या सोडतीत सुधारणा करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी माजी लोकायुक्त सुरेशकुमारयांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून अहवाल बनविण्यात आला आहे. च्त्यामध्ये एक शिफारस अल्प उत्पन्न गटातील लोकप्रतिनिधीसाठीचा कोटा रद्द करण्याबाबत आहे. मात्र १० महिन्यांपूर्वी अहवाल सादर होऊनही म्हाडा प्राधिकरणाने त्याच्यामंजुरीबाबत निर्णय घेतला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.राज्यातील बहुतांश आमदार, खासदारांची संपत्ती कोटी, लाखांच्या घरात असल्याचे त्यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झालेले आहे. काही आजी- माजी सदस्यांची मिळकत कमी असू शकते, मात्र त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मानधन, सवलतीमुळे ते किमान उत्पन्नाच्या निकषातही पात्र ठरत नसल्याने त्यांच्यासाठी कोटा का राखीव ठेवला आहे, असा सवाल आता सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.शासनाच्या नियमाप्रमाणे विविध आरक्षण प्रवर्गांनुसार प्रत्येक गटासाठी कोटानिहाय जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये प्रतिसाद न मिळाल्यास नियमाप्रमाणे त्या अन्य प्रवर्गात बदलल्या जातील. सुरेशकुमार समितीच्या अहवालाबाबत अद्याप निर्णय न झाल्याने त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही.- संभाजी झेंडे, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा