शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या घुसखोरांचा प्रश्न ११ महिने प्रलंबित

By admin | Updated: December 1, 2014 02:18 IST

म्हाडाच्या इमारतीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून अनधिकृतपणे घुसखोरी करून राहत असलेल्या साडेआठ हजारांवर रहिवाशांच्या नियमतीकरणाचा प्रस्ताव गेल्या ११ महिन्यांपासून मंत्रालयात पडून आहे

मुंबई : म्हाडाच्या इमारतीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून अनधिकृतपणे घुसखोरी करून राहत असलेल्या साडेआठ हजारांवर रहिवाशांच्या नियमतीकरणाचा प्रस्ताव गेल्या ११ महिन्यांपासून मंत्रालयात पडून आहे. राज्यातील सरकार बदलले असले तरी त्याबाबतचा निर्णय घेण्यास गृहनिर्माण विभागाची कासवगती कायम राहिली आहे. शहर व उपनगरामध्ये म्हाडाची एकूण १३ हजार संक्रमण शिबिरे (ट्रान्झिस्ट कॅम्प) आहेत. गेल्या वर्षी केलेल्या सर्व्हेमध्ये जवळपास साडेआठ हजारांवर कुटुंबे अनधिकृतपणे राहत असल्याचे उघडकीस आले. त्यामध्ये मूळ भाडेकरूकडून परस्पर खरेदी, कसल्याही व्यवहाराविना राहत असलेले आणि अतिक्रमण करून राहणाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यांना हटविणे शक्य नसल्याने म्हाडाने त्यांना नियमितीकरण्याचा प्रस्ताव जानेवारीमध्ये गृहनिर्माण विभागाला सादर केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा असताना राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. इतकेच नव्हे, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी तरी त्याचा लाभ उठविण्यासाठी कॉँग्रेस आघाडी सरकार निर्णय घेईल, अशी शक्यता असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रस्ताव प्रलंबित ठेवला होता. (प्रतिनिधी)