शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत येणार मेट्रो-३

By admin | Updated: February 13, 2015 02:13 IST

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ प्रकल्पाचे काम २०१६ या आर्थिक वर्षात सुरू होईल आणि प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासह उर्वरित समस्या मार्गी लावूनच

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ प्रकल्पाचे काम २०१६ या आर्थिक वर्षात सुरू होईल आणि प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासह उर्वरित समस्या मार्गी लावूनच हा प्रकल्प २०२० साली पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.३३ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी एकूण ३९.९ हेक्टर जमिनीची गरज भासणार आहे. त्यापैकी २७.२९ हेक्टर जमीन तात्पुरत्या कामासाठी लागणार आहे. त्यातील केवळ २.२५ हेक्टरच्या खासगी जमिनीचा वापर होणार आहे. मेट्रो ३ प्रकल्पासाठी कायमस्वरूपी ११.८० हेक्टर जमीन लागणार आहे. त्यापैकी ८.७० हेक्टरची जमीन शासकीय आणि उर्वरित ३.२० हेक्टर खासगी जमीन असणार आहे. २ हजार ४४ वृक्षांबाबत बोलताना भिडे म्हणाल्या, वृक्ष लागवड आणि पुनर्रोपणासाठी जागा निश्चित केली आहे. शिवाय पर्यावरण आणि भौगोलिक परिसरावर होणाऱ्या परिणामांचाही सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. शिवाय गिरगाव आणि काळबादेवी परिसरातील रहिवाशांवरही प्रकल्पादरम्यान अन्याय होणार नाही, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मुख्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत अश्विनी भिडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या संस्थांशी चर्चा व समन्वय साधून तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत सर्वोत्तम पर्याय निवडण्याचा आमचा प्रयत्न आहे. योग्य पुनर्वसन झाल्याशिवाय आणि रहिवाशांशी सल्लामसलत केल्यानंतरच पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईल. सार्वजनिक सुविधा पुरविणाऱ्या सेवा अन्यत्र हलविण्याबाबत बहुतेक संबंधित प्रशासकीय परवानग्या प्राप्त झाल्या असून, इतर बाबतीत तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. शासकीय भूसंपादनाची प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याने या सर्व पार्श्वभूमीवर हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण केला जाईल. (प्रतिनिधी)