शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-याच्या नावावर मोजला व्यापा-याचा माल!

By admin | Updated: March 22, 2017 02:48 IST

तेल्हारा येथील नाफेड केंद्रावरील प्रकार; दोन टोकन संशयास्पद!

सदानंद खारोडे तेल्हारा, दि. २१- येथील नाफेडच्या केंद्रावर बोगस पावत्यांवर तुरीचे मोजमाप करण्यात आल्याचा प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंगमध्ये समोर आला आहे. व्यापार्‍याचा माल शेतकर्‍याच्या नावावर मोजल्याचा हा प्रकार असल्याची चर्चा आहे. नाफेडमध्ये तूर खरेदीस आणताना कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेश पत्रिका भरून घेते. यामध्ये शेतकर्‍यांचे नाव, गाव, धान्याचा प्रकार, वजन, गाडी नंबर, फॅक्टरीचे नाव, गट नंबर, दाखला, दिनांकासह माहिती भरली जाते. याबाबतची नोंद नाफेडच्या रजिस्टरमध्ये असणे गरजेचे आहे; परंतु या ठिकाणी बाजार समितीमधील आवक-जावक रजिस्टरमध्ये नोंद आहे; परंतु नाफेड रजिस्टरमध्ये नोंद ॅहोत नाही. या संदर्भात सदर रजिस्टरमध्ये नोंद नसलेल्या शासकीय खरेदी प्रवेश पत्रिका टोकन क्रमांक 0६४, 0६५ या संशयास्पद पावती ह्यलोकमतह्ण च्या हाती लागल्या आहेत. सदर पावत्यावरसुद्धा धान्य मार्केटमधील आवक रजिस्टरमध्ये नोंद झालेली आहे असे वरून लिहिलेले आहे. विशेष म्हणजे या पावत्यांचा आधीचा अनुक्रमांक व नंतरचा अनुक्रमांक असलेल्या पावत्या कुण्याही शेतकर्‍यांकडे नाहीत नाही. तसेच या पावत्यांची नाफेडच्या रजिस्टरमध्ये कसलीही नोंद नसतानाही पावतीवरील तुरीचे मोजमाप करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, शेतकर्‍याच्या नावावर व्यापार्‍याची तूर या पावत्यावर विकल्याचे समोर आले आहे. गेल्या दीड महिन्यापासून बाजार समिती यार्डात सुरू असलेली नाफेडची तूर खरेदी शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शेतकर्‍यांच्या मालाची नासाडी होत आहे. डुकराच्या त्रासाबरोबरच किरकोळ चोरीचे प्रकारसुद्धा येथे घडले. बाजार समितीच्या यार्डात असलेल्या मालाची देखरेख करणे, बाजार समितीचे काम असले तरी बाजार समिती प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसते. या केंद्रावर शेतकर्‍यांच्या मालापेक्षा व्यापारी, दलालाच्या मालाचे मोजमाप त्वरित होते.