शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मानसिक आरोग्य धोरणाला मुहूर्त मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 06:08 IST

मसुदा शासनाला सादर : सामान्यांना सुलभरीत्या उपचार उपलब्ध करून देण्यासाठी तरतुदी

स्नेहा मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जागतिक पातळीवरील वाढता ताण पाहता, गेल्या वर्षी केंद्र शासनाने मानसिक आरोग्य कायदा संमत केला. त्यानुसार, प्रत्येक राज्यानेही मानसिक आरोग्य धोरण आखण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे, देशातील काही राज्यांमध्ये मानसिक आरोग्य धोरण तयार होऊन त्याची अंमलबजावणीही करण्यात आली. मात्र, महाराष्ट्रात अजूनही मानसिक आरोग्य धोरणाला मुहूर्तच मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य दिनी समोर आले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाकडे अजूनही परिपक्व मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे.

राज्याने मानसिक आरोग्यासाठी अर्थसंकल्पामध्ये १०० ते १२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीमधील मोठा हिस्सा कर्मचाऱ्यांचे पगार व व्यवस्थापनामध्ये खर्च होतो. केंद्र शासनाने मानसिक आरोग्य अधिनियम मंजूर केल्यानंतर, राज्याने मानसिक आरोग्य प्राधिकरण तयार केले. या प्राधिकरणात शासकीय आणि अशासकीय अशा नऊ सदस्यांची नियुक्ती करून त्यांना मानसिक आरोग्य धोरण तयार करण्याची जबाबदारी दिली. त्यानुसार, या प्राधिकरणाने मानसिक आरोग्य धोरणाचा मसुदा राज्य शासनाला सादर केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या मानसिक आरोग्य शाखेच्या सहसंचालिका डॉ. साधना तायडे यांनी दिली.

या संदर्भात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव म्हणाले की, राज्याच्या मानसिक आरोग्य धोरणात सामान्यांना अधिक सुलभरीत्या उपचार मिळावे, यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. राज्याच्या मानसिक आरोग्य प्राधिकरणाने हा मसुदा दोन महिन्यांपूर्वी शासनाला सादर केला आहे. मात्र, आता आचारसंहितेमुळे याबाबत कोणताही निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकांनंतर याबाबत निर्णय अपेक्षित आहे.मानसिक आरोग्याविषयी अजूनही अज्ञानमानसिक स्वास्थ्य लाभावे, यासाठी आपण झटत असतो. मानसिक आरोग्याच्या भावनिक पैलूंचा जास्त विचार होताना दिसतो. एखादी कृती, घटना किंवा नातेसंबंधामुळे आपण समाधानी असलो की आपल्याला वाटते, आपले मानसिक आरोग्य सुदृढ आहे. मात्र, मानसिक आरोग्य ही स्थिर बाब नाही. परिस्थितीनुसार यात नियमित बदल होत राहतात. त्यामुळे मानसिक आरोग्य म्हणजे काय, त्यात कोणत्या प्रक्रियांचा समावेश असतो? मानसिक सुदृढता व स्वास्थ्य का महत्त्वाचे असते? याबाबत सर्वसामान्यांत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.- डॉ. योगेश शाह, मानसोपचारतज्ज्ञदेशात १० कोटींहून अधिक मानसिक रुग्णच्जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतातील १३५ कोटी लोकसंख्येपैकी ७.५ टक्के लोक हे मानसिक विकारांनी ग्रस्त आहेत.च्यातील काहींच्या विकाराचे स्वरूप अतिशय गंभीर आहे.च्जगातील १९५ देशांपैकी भारतासह असे फक्त १३ देश आहेत, जिथे मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्यांची संख्या प्रत्येकी १० कोटींच्या वर आहे.च्भारतामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने अशा प्रकारचे रुग्ण असूनही, त्यांच्यावर उपचार करण्याकरिता फक्त ३,८०० मानसोपचार तज्ज्ञ, ८९८ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, ८५० सायक्रिअ‍ॅटिक सोशल वर्कर, १,५०० सायक्रिअ‍ॅटिक नर्सेस, ४३ मनोरुग्ण रुग्णालये इतकीच संसाधने उपलब्ध आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य