शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकांजवळ वैद्यकीय सेवा

By admin | Updated: December 4, 2014 03:00 IST

न्यायालयाच्या दणक्यानंतर रेल्वे प्रशासनाने मुंबई व उपनगरांतील १४ रेल्वे स्थानकांजवळ आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़

अमर मोहिते, मुंबईन्यायालयाच्या दणक्यानंतर रेल्वे प्रशासनाने मुंबई व उपनगरांतील १४ रेल्वे स्थानकांजवळ आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़ येत्या तीन महिन्यांत ही केंद्र सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे़ त्यामुळे नवीन वर्षात तरी निदान रेल्वे अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळतील़ या सेवा केंद्रात एक एमबीबीएस डॉक्टर, नर्स व साहाय्यक पूर्णवेळ असेल़ ही टीम रेल्वे अपघातातील जखमींवर विनाविलंब उपचार करेल़ या सेवा केंद्राआधी रेल्वेने जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रेल्वे स्थानकांजवळ हेलिपॅड उभारण्याचा निर्णय घेतला आहे़ याचे काम सुरू असून या दोन निर्णयांमुळे रेल्वे अपघातात वेळेवर उपचार न मिळाल्याने बळी जाणाऱ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे़ रेल्वे अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेच्या काही स्थानकांजवळ आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र सुरू करा, असे आदेश मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठाने गेल्या वर्षी मार्च महिन्यात दिले होते़ मात्र त्याची अंमलबजावणी रेल्वे प्रशासन करीत नव्हते़ अखेर गेल्या महिन्यात न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने रेल्वे प्रशासनाचे कान उपटत रेल्वे संवदेनशील नसल्याचा ताशेरे ओढले़ तसेच रेल्वे बोर्डाने याचा निर्णय घेण्यासाठी दोन अधिकारी नेमावेत व त्यांनी याबाबतच निर्णय घ्यावा, असे आदेशही न्या़ ओक यांनी दिले होते़ याची दखल घेत रेल्वेने दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली व त्यांनी रेल्वे स्थानकांजवळ आपत्कालीन सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे़ ज्या रेल्वे स्थानकांजवळ जागा उपलब्ध असेल, तेथे ही केंद्रे लगेचच सुरू केली जातील व ज्या स्थानकांजवळ जागा नसेल तेथे तातडीने जागा शोधून ही केंद्र सुरू केली जाणार आहे़ याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी जनहित याचिका केली आहे़ अपघातातील जखमींना विनाविलंब उपचार मिळावेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वेला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़ त्याची दखल घेत न्यायालयाने वरील आदेश दिले होते व त्यानुसार रेल्वेने हा निर्णय घेतला असून त्याची माहिती न्यायालयात सादर केल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या हाती लागले आहे़ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णवेळ आसने राखीवरेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णवेळ आसने राखीव ठेवण्याचा निर्णयही रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़ सध्या ही आसने ठरावीक वेळेसाठी ज्येष्ठ नागरिकांकरिता राखीव असतात़ याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल असून ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेमध्ये गैरसोय होत असल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे़ त्याची दखल घेत रेल्वेने हा निर्णय घेतला आहे़