ठाण्यात 9 ऑगस्टला महापौर मॅरेथॉन

By Admin | Updated: July 11, 2014 00:03 IST2014-07-11T00:03:08+5:302014-07-11T00:03:08+5:30

ठाणो महापालिकेची यंदाची रौप्य महोत्सवी मॅरेथॉन स्पर्धा येत्या 9 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दिली.

Mayor Marathon in Thane on 9th August | ठाण्यात 9 ऑगस्टला महापौर मॅरेथॉन

ठाण्यात 9 ऑगस्टला महापौर मॅरेथॉन

ठाणो : ठाणो महापालिकेची यंदाची रौप्य महोत्सवी मॅरेथॉन स्पर्धा येत्या 9 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे यंदा प्रथमच ही स्पर्धा रविवारऐवजी शनिवारी घेतली जात आहे. रक्षाबंधन, दहीकाला या सणांबरोबरच आचारसंहितेची भीती असल्यानेही स्पर्धेच्या कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आल्याचे सूत्रंनी स्पष्ट केले. त्यातही सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असल्याने या स्पर्धेला प्रायोजक शोधून त्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात यावी, अशी सूचना काँग्रेसने केली आहे.
पावसाळा सुरू झाला की सर्वाचे लक्ष लागते ते ठाणो महापौर वर्षा मॅरेथॉनकडे. या वर्षी पाऊसच लांबल्याने ही स्पर्धा लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. सुरुवातीला या स्पर्धेकरिता 24 ऑगस्ट ही तारीख ठरवण्यात आली होती. मात्र ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक असल्याने त्याची आचारसंहिता केव्हाही लागू शकते. त्यामुळे या तारखेला मंजुरी देण्यात आलेली नाही. 1क् ऑगस्टला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा आहे. त्यानंतर येणा:या 17 ऑगस्टच्या रविवारी श्रीकृष्ण जयंती असल्याने ही स्पर्धा कधी घ्यायची, या विवंचनेत सत्ताधारी शिवसेना होती. 
अखेरीस आतार्पयतची 24 वर्षाची परंपरा मोडून रविवारऐवजी शनिवारी, 9 ऑगस्टला ती घेण्याचे निश्चित झाले आहे. यंदा या स्पर्धेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने ही स्पर्धा मोठय़ा जल्लोषात करण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा मानस  होता. मात्र, सध्या ठाणो महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने ही स्पर्धा महापालिकेच्या खर्चातून न घेता एखाद्या इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून घेण्यात यावी, तसेच यासाठी शहरातील व्यापा:यांचाही सहभाग घेऊन त्यांच्या प्रायोजकतेमधून या स्पर्धेचा खर्च करण्यात यावा, अशी सूचना काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते मनोज शिंदे आणि ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली.
 
च्यंदा ठाणो मॅरेथॉन स्पर्धेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने या स्पर्धेकरिता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बोलवण्यात यावे, अशी मागणी ठाणो काँग्रेसने मॅरेथॉनच्या बैठकीत महापौरांकडे केली आहे.
 
च्दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा धूमधडाक्यात ही स्पर्धा साजरी करण्याकरिता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना या स्पर्धेसाठी बोलवण्याच्या विचारात असल्याची माहिती सूत्रकडून मिळाली आहे. 
 
च्यंदा या स्पर्धेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने ही स्पर्धा मोठय़ा जल्लोषात करण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा मानस  होता. मात्र सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने ही स्पर्धा महापालिकेच्या खर्चातून न घेता एखाद्या इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून घेण्यात यावी, अशी सूचना होती.

 

Web Title: Mayor Marathon in Thane on 9th August