शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मे महिन्यात निवडणुकीची शक्यता

By admin | Updated: April 4, 2017 03:31 IST

पनवेल महापालिकेची पहिली निवडणूक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मयूर तांबडे,पनवेल- पनवेल महापालिकेची पहिली निवडणूक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शहरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. एप्रिल-मे महिन्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्याने पालक सुटीत गावी जाण्याच्या तयारीत असतात. त्यामुळे मे महिन्यात निवडणुका जाहीर झाल्या तर त्याचा परिणाम मतदानावर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.पनवेल महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग लवकरच घोषित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर हा परिसर कॉस्मोपॉलिटन परिसर म्हणून ओळखला जात असून देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक याठिकाणी मोठ्या संख्येने राहतात. शाळांना सुटी लागल्यावर मतदानाकडे पाठ फिरवून मतदार मूळ गावी गेल्यास त्याचा फटका उमेदवारांना बसू शकतो. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा मे महिन्यात झाली तर मतदान कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदान कमी झाल्याचा फटका सर्वच पक्षांना बसणार आहे. त्यामुळे सारेच पक्ष महापालिकेच्या निवडणुका जून महिन्यात घेण्यासाठी आग्रही आहेत. मे महिन्यात महापालिकेच्या निवडणुका झाल्यास भाजपा, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यासह भारिप, आरपीआय या पक्षांची दमछाक होणार आहे. मतदारांना गावावरून मतदानासाठी आणण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.पनवेलमध्ये राजकीय पक्षांची लगबग; सुटीमुळे मतदानावर परिणाम होण्याची भीतीमहापालिका निवडणुकीसाठी बनविण्यात आलेल्या चार लाख मतदारांच्या यादीत जवळपास दोन लाख मतदारांच्या नावांचा घोळ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मतदार याद्या नव्याने बनवून त्या प्रसिध्द कराव्या लागणार आहेत.>पनवेल महापालिकेच्या निवडणुका साधारणत: २0 मेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. मतदार याद्या दुरु स्तीचे काम सध्या सुरू आहे.- राजेंद्र निंबाळकर, आयुक्त, पनवेल महापालिका