शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मनसेत पडली फूट!

By admin | Updated: November 4, 2014 03:25 IST

दोन महिन्यांपूर्वी राज नाशिक दौऱ्यावर असताना, गुडघेदुखीचे निमित्त करून गितेंनी भेटणे टाळले होते

नाशिक : नाशिकमधील मनसेचे माजी आमदार वसंत गिते यांनी प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या समर्थनार्थ पाठोपाठ दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे ‘कृष्णकुंज’वर पाठविले. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीनंतर पराभवाचे पोस्टमॉर्टेम करण्यास येत्या बुधवारी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वीच ही उलथापालथ घडल्याने राजगडाला धक्का बसला आहे.मनसेचे माजी आमदार गिते हे भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा होतीच. स्थानिक भाजपा नेत्यांनी त्यास दुजोरा दिला असला तरी गिते यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे़ आपण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला, परंतु पक्ष सोडलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. असे असले तरी गिते आपल्या किमान २० नगरसेवकांना घेऊन भाजपात जाणार असल्याच्या चर्चेने अन्य नेत्यांनी तातडीने नगरसेवकांची बैठक घेऊन तटबंदी उभारण्याचा प्रयत्न चालवला आहे. आठ वर्षे आपण पक्षाची जबाबदारी सांभाळली; परंतु वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव प्रदेश सरचिटणीस पदावर काम करू शकत नसल्याने आपल्याला कार्यमुक्त करावे, अशी विनंती गिते यांनी राजीनाम्यात व्यक्त केली आहे. तीन आमदार व महापालिकेची सत्ता असल्याने नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता. मनसेच्या स्थापनेपासून राज यांच्याबरोबर असलेले गिते हे पक्षातील सर्वेसर्वा होते; परंतु लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज यांनी नाशिकमध्ये व विशेषत: महापालिकेतील सत्तेची सूत्रे पक्षाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव ढिकलेंकडे दिली. त्यानंतर गितेंची नाराजी सुरू झाली. दोन महिन्यांपूर्वी राज नाशिक दौऱ्यावर असताना, गुडघेदुखीचे निमित्त करून गितेंनी भेटणे टाळले होते. (प्रतिनिधी)