शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानचा डेंजरपाथ

By admin | Updated: June 8, 2017 02:59 IST

पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळे भुरळ घालतात तर कोणाला माथेरानमधील घोडेस्वारी आवडते

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : माथेरानचे निसर्ग वैभव सर्वत्र सामावलेय. येणाऱ्या पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळे भुरळ घालतात तर कोणाला माथेरानमधील घोडेस्वारी आवडते. काहींना येथील नीरव शांतता आणि गर्द झाडी आवडते. माथेरानचे वैशिष्ट्य दाट जंगलातून तर कधी दरीच्या कडेने जाणाऱ्या पायवाटांमध्ये सामावले आहे. अशीच दरीच्या टोकावरून जाणारी लांबलचक पायवाट म्हणजे डेंजरपाथ. नावाप्रमाणे हा रस्ता आहे. ही पायवाट म्हणजे माथेरानच्या निसर्गाचे मनमोहक रूप आहे. पर्यटकांना याची माहिती देणारी व्यवस्था नसल्याने पर्यटक यापासून ते अनभिज्ञ राहतात.माथेरान येथील शार्लोट लेकच्या जवळ पश्चिमेला लॉर्ड पॉइंट आहे. त्या लॉर्ड पॉइंटच्या बाजूने एक पायवाट जाते. एका बाजूला दाट जंगल आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी यामुळे या मार्गाला डेंजरपाथ हे नाव पडले. ब्रिटिश काळात डॉ. जे. पी. बॅरी यांनी या मार्गाला हे नाव दिले. लॉर्ड पॉइंटकडून निघताना अगदी छोटी दिसणारी पायवाट पुढे पुढे अगदी निमुळती होत जाते. जुलै २००५ च्या अतिवृष्टीमध्ये या मार्गाचे अस्तित्व धोक्यात आले. लॉर्ड पॉइंट ते बेलव्हेंडर पॉइंटपर्यंत जाणारी ही पायवाट आता फाउंटन लॉजच्या मागील बाजूस खंडित झाली आहे. आता ही वाट खंडित झाली असली तरी डेंजरपाथचा रु बाब मात्र तोच आहे. लॉर्ड पॉइंटकडून निघाल्यास डेंजर पाथच्या उजव्या बाजूस प्रबळगड तर समोर वनट्री हिल पॉइंटचे दर्शन होते. दरीच्या पायथ्याला मोरबे धरणाचे बॅक वॉटर दृष्टीस पडते, तर डाव्या बाजूला माथेरानची समृद्ध वनसंपदा आपली सोबत करते. माथेरानच्या निसर्गाची ही विविध रूपे माथेरानचे पर्यटन समृद्ध करतात. त्याची ओळख पर्यटकांना करून देण्याची गरज आहे.माथेरानच्या वारसा स्थळांच्या यादीत डेंजरपाथचा समावेशमाथेरान नगरपरिषदेने जी निसर्ग आणि मानवनिर्मित वारसा स्थळांची यादी बनविली आहे त्यामध्ये डेंजर पाथचा समावेश आहे. ब्रिटिश काळात डॉ. जे. पी. बॅरी यांनी या पायवाटेला हे नाव दिले असून लहान मुलांनी या वाटेवर जाणे धोकादायक आहे असे या हेरिटेज मॅन्युअलमध्ये नमूद करण्यात आले आहे.