दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या

By Admin | Updated: September 14, 2016 00:17 IST2016-09-14T00:17:32+5:302016-09-14T00:17:32+5:30

अकोला जिल्ह्यातील घटना; दोन चिमुकल्यांसह शेतातील विहिरीमध्ये घेतली उडी.

Marriage With Two Pigs | दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या

दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या

पातूर(जि. अकोला), दि. १३: येथून जवळच असलेल्या चिंचखेड परिसरातील शेतात मजुरी करणार्‍या शुभांगी सुनील झळके या विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना १३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.
चिंचखेड येथील सुनील झळके हा पत्नी शुभांगी, गोविंदा व पूजासह याच गावातील दीपक धाडसे यांच्या शेतावर गेल्या दोन महिन्यांपासून मजुरीने कामावर होता. तो शेतातच कुटंबासह राहत होता. दोन दिवसाअगोदर माहेरी जाते म्हणून शुभांगी गोविंदा (४ वर्षे) व मुलगी पूजा (२ वर्षे) यांना घेऊन शेतावरून निघून गेली; परंतु ही माहेरी न जाता हिने आपल्या दोन मुलांसह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी शेतातील विहिरीवर दुसरे मजूर काम करण्याकरिता गेले असता, त्यांना दोन मुलांचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळले. याबाबत पोलीसांना तातडीने कळविण्यात आले. शुभांगी झळके हीसुद्धा सापडली नसल्याने तिनेही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. तसेच ४0 फूट विहिरीला पाणी असल्यामुळे विहिरीत गळ टाकून शुभांगीचा मृतदेह काढण्यात आला. शुभांगीने दोन मुलांसह आत्महत्या का केली याबाबत पोलीस तपास करीत आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनाकरिता अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून पोलीसांनी या घटनेसंदर्भात र्मग दाखल केला आहे.

Web Title: Marriage With Two Pigs