शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

टोमॅटोचे बाजारभाव कोसळले, अवघे दोन रुपये किलो भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 21:40 IST

नारायणगावचे टोमॅटो मार्केट राज्यातील अग्रगण्य मार्केट म्हणून ओळखले जाते. मात्र, यावर्षी बाजारभाव नसल्याने मोठया प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. टोमॅटोचे बाजारभाव घसरत गेल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

ठळक मुद्देसलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो उत्पादनाला मोठा फटका आळेफाटा येथील डाळींब मार्केटमध्ये डाळींबाला ६0 ते ७५ रुपये किलो असा बाजारभाव

नारायणगाव : मेथी, कोथिंबीरला बाजारभाव नसल्याने शेतकरी त्रस्त असतानाच टोमॅटोचे बाजारभाव मंगळवारी (दि.२८) रोजी कोसळले. आवक कमी असतानाही मागणी नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात टोमॅटो क्रेट ला ५0 ते १५0 रू. असा बाजारभाव मिळाला. टोमॅटोला प्रतिकिलो २ रू.५0 पैसे बाजारभाव असल्याने शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात टोमॅटोची विक्री केली तर काहींनी टोमॅटो फेकून दिली. टोमॅटो हंगाम सुरू झाल्यापासून पाच महिन्यांच्या कालावधीत निच्चांकी असा दर टोमॅटोला मिळाला आहे.नारायणगावचे टोमॅटो मार्केट राज्यातील अग्रगण्य मार्केट म्हणून ओळखले जाते. टोमॅटो खरेदीसाठी परराज्यातून शंभर ते दिडशे व्यापारी येतात. जून २0१८ पासून टोमॅटोचा हंगाम सुरू झाला, परंतु जून पासूनच सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव मिळाला नाही. जून व जुलै मध्ये चांगल्या प्रतिच्या टोमॅटोला ३५0 ते ४00 रुपये प्रति के्रट असा बाजारभाव मिळाला. त्यानंतर टोमॅटोचे बाजारभाव घसरत गेल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.गेल्या वर्षी टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने अनेक शेतकरी माला-माल झाले. मात्र, यावर्षी बाजारभाव नसल्याने मोठया प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. त्यातच सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. नारायणगावचे टोमॅटो मार्केटमध्ये आज (दि.२८) रोजी १७ हजार ८७५ टोमॅटोची आवक झाली.२0 किलोच्या क्रेटला ५0 रुपये पासून १५0 पर्यंत बाजारभाव मिळाला. एप्रिलनंतर सर्वाधिक कमी दर आज मिळाला आहे.     टोमॅटोचे बाजारभाव कोसळल्यानंतर मेथी, कोथंबीर, शेपु या भाजीपाल्यांचे बाजारभाव देखील स्थिर आहेत. कोथंबीर ५२ हजार ६00 जुडीची आवक झाली. त्यास शेकडा ३00 ते १00१ असा बाजारभाव मिळाला. मेथी ९६ हजार ३00 जुडीची आवक झाली. त्यास शेकडा ३00 ते १00१ असा बाजारभाव मिळाला. शेपु २५ हजार ९00 जुडीची आवक झाली. त्यास शेकडा ३0१ ते ५0१ असा बाजारभाव मिळाला. मेथी, कोथंबीर, शेपु या भाजीपाल्यांची एकुण १ लाख ७४ हजार ८00 जुडयांची आवक नारायणगाव उपबाजार केंद्रात झाली,  अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड.संजय काळे व संचालक अ‍ॅड. निवृत्ती काळे यांनी दिली.   ...........................एप्रिल : ३ लाख ४९ हजार १५0 कॅरेटची आवक झाली. प्रति कॅरेट ४0 ते १00 रुपये  बाजारभाव मिळालामे :  ८ लाख १ हजार ८१0 कॅरेटची आवक झाली. प्रति कॅरेट ५0 ते २५0 रुपये बाजारभाव मिळाला. जून : ११ लाख२१ हजार ६३५ कॅरेटची आवक झाली. प्रति कॅरेट१५0 ते २५0 रुपये बाजारभाव मिळाला.जुलै :  १३लाख ७९ हजार ६00 कॅरेटची आवक झाली. प्रति कॅरेट २00 ते ४00 रुपये बाजारभाव मिळाला. आॅगस्ट :  ७ लाख ४३ हजार ६६५ कॅरेटची आवक झाली. प्रति कॅरेट१५0 ते २५0 रुपये बाजारभाव मिळाला. ...................डाळींब ६0 ते ७५ रुपये किलो आळेफाटा येथील डाळींब मार्केटमध्ये डाळींबाला ६0 ते ७५ रुपये किलो असा बाजारभाव मिळाला. २0 किलोच्या डाळींब क्रेटला (जम्बो साईज) १२00 ते १२५१ बाजारभाव मिळाला. नं.१ च्या डाळींब कॅरेटला १000 ते १२00 बाजारभाव मिळाला. नं.२ च्या डाळींब क्रेटला ६00 ते १000 बाजारभाव मिळाला. नं.3 च्या २00 ते ६00 बाजारभाव मिळाला. एकूण २६७५ कॅरेटची आवक झाली. गुरूवार सोडून दररोज डाळींबाची मोठया प्रमाणात खरेदी-विक्री आळेफाटा येथे होते, अशी माहिती बाजार समितीचे उसभापती दिलीप डुंबरे व नारायणगाव उपबाजार केंद्राचे व्यवस्थापक शरद धोंगडे यांनी दिली 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtraमहाराष्ट्र