शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

केंद्राच्या नोकरीत 'मराठी' टक्का कमी; परीक्षा देणारे लाखात, निवडीचे प्रमाण मात्र अल्प

By पोपट केशव पवार | Updated: February 1, 2025 16:55 IST

जनजागृतीचा अभाव : इंग्रजी भीतीही ठरतेय कारणीभूत

पोपट पवारकोल्हापूर : केंद्र सरकारचीनोकरी म्हणजे गलेलठ्ठ पगार, भरपूर सुविधा अन् समाजात एक वेगळी प्रतिष्ठा. त्यामुळे केंद्र सरकारचीनोकरी मिळवण्यासाठी अनेक जण आयुष्यभर धडपडत असतात. मात्र, केंद्र सरकारच्या सर्वच विभागांमध्ये महाराष्ट्रातील मुलांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. मार्गदर्शनाचा अभाव, इंग्रजीची भीती आणि राज्याबाहेर न जाण्याच्या मानसिकतेमुळे मराठी मुले केंद्र सरकारच्या सुखाच्या नोकरीला मुकत असल्याचे चित्र आहे.केंद्र सरकारच्या रेल्वे, बँकिंग, एलआयसी यासह स्टाफ सिलेक्शनच्या जागा प्रत्येक वर्षी निघतात. एसबीआय व रेल्वेमध्ये तर प्रत्येक वर्षी हजारो जागा भरल्या जातात. मात्र, या परीक्षा देण्याकडेच महाराष्ट्रातील मुले कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. परीक्षा दिली तर निवड होण्याचे प्रमाणही अगदी नगण्य आहे.मार्गदर्शनाचा अभावस्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांचा अभ्यासक्रम हा शाळेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाशी सुसंगत आहे. मात्र, यातील मायनस पद्धती समजून न घेतल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा घोळ होतो. विशेषत: बँकिगच्या जागा कधी सुटतात येथपासून ते अभ्यासक्रमांपर्यंत विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे या परीक्षांच्या भानगडीत विद्यार्थी पडत नाहीत. स्टाफ सिलेक्शन परीक्षांबाबत स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणारे क्लासचालकही तितकीशी जनजागृती करत नसल्याचा आक्षेप या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आहे.परीक्षा देणारे लाखात, निवडीचे प्रमाण मात्र अल्पकाही दिवसांपूर्वी एसबीआयने क्लर्क पदासाठी देशभरातील १४ हजार जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. ५० लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामध्ये महाराष्ट्रातील अडीच लाख विद्यार्थ्यांचा समावेश होता. मात्र, यामध्ये निवडीचे प्रमाण हे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहे. हीच परिस्थिती रेल्वेच्या परीक्षांबाबत आहे. आपल्याकडे शंभर गुणांचा पेपर सोडवण्यासाठी तीन तासांचा वेळ दिला जातो. स्टाफ सिलेक्शनच्या पेपरला शंभर गुणांसाठी अवघा एक तासाचा वेळ असतो. त्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याची गती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राखता येत नसल्यामुळे या परीक्षांमध्ये विद्यार्थी यशस्वी होत नसल्याचा निष्कर्ष या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून काढला जात आहे.

स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांचा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील मुलांनी समजून घेणे गरजेचे आहे. परीक्षा देताना गती राखण्याबरोबरच या परीक्षांमधील नियमानुसार आपले गुण वजा होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागते. आपले विद्यार्थी नेमके येथेच चुकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का कमी दिसतो. - अविराज गवळी, एसबीआय शाखा प्रबंधक, गोकुळ शिरगाव.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCentral Governmentकेंद्र सरकारjobनोकरीmarathiमराठी