शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:06 IST

भाजपामुळेच पाचवी, सहावी, सातवीत हिंदीची सक्ती होती ती आता नाही इतके स्पष्ट सत्य आहे असंही आशिष शेलार यांनी म्हटलं. 

मुंबई - मराठीबद्दल आम्ही कट्टर आहोत. मराठी भाषेबद्दल कट्टर आहोत पण विद्यार्थी हिताचे खंदे समर्थक आहोत. हिंदुस्थानी अन्य भाषांचे आम्ही खूनी नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे. राज्यात सक्ती शब्द वारंवार वापरला जातो. राज्यात कुठल्याही भाषेची प्राथमिक शिक्षणात सक्ती केवळ मराठीची आहे अन्य कुठल्याही भाषेची नाही. मराठीची सक्ती आणि समर्थन आम्ही करतो. राज्यात हिंदीची सक्ती आहे का तर याचे उत्तर नाही असं सांगत भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी हिंदी भाषा सक्तीवरून ठाकरे बंधू यांना टोला लगावला. 

आशिष शेलार म्हणाले की, राज्यात हिंदीची सक्ती नाही. राज्यातील शिक्षणात हिंदीची सक्ती ही भूमिका भाजपाची नाही. पर्यायी भाषा म्हणून विद्यार्थ्यांच्या इच्छेसाठी जितक्या भाषा आहेत त्यात हिंदी असायला हवी हे आमचे मत आहे. हिंदी ऐच्छिक भाषेत असायला हवी हे आमचे मत आहे. त्यामुळे याचा विपर्यास असेल, कुणाचा गैरसमज असेल तर तो दूर करावा. भाजपाची भूमिका आणि राज्य शासनाच्या शैक्षणिक धोरणेत अतिशय स्पष्टता आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच जे हिंदीबाबत गैरसमज पसरवत आहेत. हिंदी भाषा आणि भाजपा असं राजकीय वातावरण निर्माण करतायेत त्यांना एक सांगतो. याआधीच्या सरकारने पाचवी, सहावी, सातवीला हिंदी सक्ती केली होती, ती भाजपा सरकारच्या निर्णयामुळेच हटली. हिंदी भाषा सक्ती म्हणून नव्हे तर ऐच्छिक आणि पर्याय म्हणून ठेवली आहे. पाचवी, सहावी, सातवीत हिंदीची सक्ती होती ती आता भाजपामुळेच नाही इतके स्पष्ट सत्य आहे असंही आशिष शेलार यांनी म्हटलं.

दरम्यान, फेब्रुवारी २०२२ रोजी राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्याने स्वीकारले, त्याचे प्रशासकीय काम सुरू झाले. त्यावेळी त्रिभाषा सूत्र वापरले गेले तेव्हा उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांनी मराठीबाबत आग्रही राहावे, ते आग्रही राहिले नाहीत तर भाजपा त्यासाठी आग्रह करेल. पण त्रिभाषा सूत्र याबाबतचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कारवाई २०२२ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली असा दावाही आशिष शेलार यांनी केला. 

त्रिभाषा शिकणारे मुले आजही आहेत. 

त्रिभाषा सूत्र आणि हिंदी हा पर्याय या दोन्ही गोष्टी एकत्रित करून गैरसमज पसरवला जात आहे. काही जण जाणुनबुजून तर काही नकळत हे करत आहेत. विद्यार्थ्याच्या हितासाठी त्रिभाषा सूत्र आणले आहे. मराठी मुले शिकणाऱ्या शाळांमध्ये, मराठी मुले ज्या शाळेत शिकतात. ज्याचे शैक्षणिक माध्यम इतर भाषेचे आहे अशा सीबीएसई, आयसीएसई, कॅम्ब्रिज या शाळा राज्यात सुरू आहेत. त्या आज सुरू नाहीत. कित्येक वर्षापासून सुरू आहे. त्या शाळांचे माध्यम मराठी सोडून अन्य आहे. २०२० साली आपण जो कायदा केला मराठी अनिवार्य, त्यामुळे मराठी भाषा तिथे शिकवली जात आहे. त्यामुळे एकाच राज्यात, एकाच मराठी आईच्या पोटी जन्मलेले विद्यार्थी इतर माध्यमांत शिकतायेत तिथे विद्यार्थ्यांमध्ये असमानता होतेय. त्यामुळे त्रिभाषा सूत्राचा हा पहिला मुद्दा आहे. काही लोक डोळेझाक मुद्दाम करतायेत. राज्य सरकारी शिक्षण मंडळाच्या शाळा, अनुदानित शाळा ज्या इतर माध्यमांच्या आहेत त्याचे विद्यार्थी १० टक्के आहेत. भाजपाच्या काळात हे चालू झाले नाही ते वर्षानुवर्षे आहेत. त्यात ऊर्दू पासून बंगाली शिकवले जाते. तिथे २०२० मध्ये मराठी अनिवार्य घेतल्यामुळे तिथे मराठीसह इतर २ भाषा शिकतायेत. त्यामुळे त्रिभाषा शिकणे अवघड आहे. ते योग्य नाही म्हणणाऱ्यांसाठी त्रिभाषा शिकणारे मुले आजही आहेत हे दिसून येते असं आशिष शेलार यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाhindiहिंदीRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे