मराठी कुटुंब दुबईत अडकले, भारतात यायचे मार्ग बंद झाले; सुप्रिया सुळेंचे केंद्राला मदतीचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 13:55 IST2026-03-01T13:53:38+5:302026-03-01T13:55:30+5:30
Supriya Sule News: एक मराठी कुटुंब दुबईत अडकले असून, त्यांना तातडीची मदत करण्याचे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

मराठी कुटुंब दुबईत अडकले, भारतात यायचे मार्ग बंद झाले; सुप्रिया सुळेंचे केंद्राला मदतीचे आवाहन
Supriya Sule News: अण्वस्त्रनिर्मिती रोखण्यासाठी करार करण्याकरिता चर्चेच्या तीन फेऱ्या अपयशी ठरल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर जोरदार हल्ले चढविले. या हल्ल्यात इराणमध्ये २०० पेक्षा अधिक जण ठार झाले. दक्षिण इराणमध्ये मिनाब येथे शाळेला लक्ष्य करण्यात आले, यात ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इराणने इस्रायलसह आठ देशांवर प्रतिहल्ले केले. यामुळे अनेक विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत. दुबईसह अनेक ठिकाणी भारतीय अडकले आहेत. भारतात सुरक्षित परत येण्यासाठी केंद्र सरकारला साद घातली जात आहे.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी इस्रायल आणि इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधला आहे. याबाबतची माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत दिली. मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे की, इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला. तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिकचं आवाहन केलं. तसेच इराणचे परराष्ट्रमंत्री मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली.
मराठी कुटुंब दुबईत अडकले, भारतात यायचे मार्ग बंद झाले
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर एक पोस्ट करत मराठी कुटुंब अडल्याची माहिती दिली. पुण्यातील अभिषेक कलंत्री, नम्रता कलंत्री आणि मिराया कलंत्री सध्या दुबईमध्ये अडकले आहेत आणि त्यांना तातडीने मदतीची आवश्यकता आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्रालय आणि दुबईतील भारतीय दूतावास यांना विनंती आहे की, कृपया आवश्यक ती मदत द्यावी आणि त्यांना लवकरात लवकर भारतात सुरक्षित परतण्याची सोय करावी, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आम्ही सर्व बाजूंना संयम बाळगण्याचे, संघर्ष टाळण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन करत आहोत. तणाव कमी करण्यासाठी, मूलभूत समस्या सोडवण्यासाठी संवाद, राजनैतिक मार्ग अवलंबला हवा. सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
Abhishek Kalantri, Namrata Kalantri and Miraya Kalantri from Pune are currently stranded in Dubai and require urgent assistance.
— Supriya Sule (@supriya_sule) March 1, 2026
Requesting Hon. @DrSJaishankar ji, @cgidubai and @MEAIndia to kindly extend necessary support and facilitate their safe return to India at the…