शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या शुभेच्छापत्रातून ‘मराठी’ गायब

By admin | Updated: December 31, 2014 01:37 IST

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी’ हा मराठीबाणा फक्त कवितेपुरताच मर्यादित राहिला की काय,

विक्री घटली : कंपन्यांनी नवीन कार्डचे डिझाईन तयार केलेच नाही नागपूर : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी’ हा मराठीबाणा फक्त कवितेपुरताच मर्यादित राहिला की काय, असा प्रश्न पडला आहे. कारण, यंदा नवीन वर्षाच्या शुभेच्छापत्रामधील ‘मराठी’च गायब झाली आहे. मराठीचे संदेशपत्र खरेदी करणारे कमी झाल्याने कंपन्यांनी उत्पादनच घटविले आहे. मराठीचा अभिमान बाळगणाऱ्यांसाठी हा मोठा धक्काच आहे.स्वदेशी कंपनीने मराठीतील पहिले शुभेच्छापत्र १९८४-१९८५ साली बाजारात आणले. आकर्षक मुखपृष्ठ, हृदयाला जाऊन भिडणारे काव्य आणि स्नेहाचा स्पर्श यामुळे ही शुभेच्छापत्रे हातोहात विक्री होऊ लागली. भाषेचा हा मार्केट फंडा लक्षात घेऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी १९९७ मध्ये इंग्रजीसोबत मराठी शुभेच्छापत्रे बाजारात आणली. २०११ पर्यंत इंग्रजीच्या बरोबरीने नव्हे, तर त्याहून अधिक मराठी संदेशपत्रे विक्री होत असत. मात्र, नंतर हळूहळू मराठी संदेशपत्रांच्या विक्रीला ग्रहण लागणे सुरू झाले. यंदा एकाही कंपनीने नवीन डिझाईन बाजारात आणले नाही. कार्ड उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंग्रजी ग्लोबल भाषा आहे. भारतच नव्हे तर विदेशातही मुंबई व दिल्ली येथून मोठ्या प्रमाणात इंग्रजीचे कार्ड निर्यात होतात. मात्र, मराठीचे कार्ड पुणे व मराठवाड्यातच जास्त विकले जात होते. आता त्यातही मोठी घट आल्याने नवीन डिझाईन तयार करून विक्री करणे परवडत नसल्याने नववर्षाच्या शुभेच्छा देणारे मराठीतील शुभेच्छापत्रेछापली नाहीत. (प्रतिनिधी)आपुल्या घरीच हाल सोसते मराठी व्हॅटस् अ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटरच्या जगातही इंग्रजी भाषेतील शुभेच्छापत्रांची मागणी टिकून आहे; पण मागणीअभावी मराठीचे शुभेच्छापत्र बाजारातून गायब होत आहे.‘पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरीच हाल सोसते मराठी’, या सुरेश भट यांनी आपल्या कवितेत मराठीचे जे दु:ख व्यक्त केले ते शुभेच्छापत्रांच्या उलाढालीतून सत्य पुन्हा एकदा समोर आले आहे. यासंदर्भात राजस स्टेशनरीचे जयंत घारपुरे म्हणाले, मागील तीन वर्षांपासून मराठी शुभेच्छापत्रांचा खप कमी झाला आहे. दुसरीकडे इंग्रजीतील संदेशांना मागणी वाढली आहे. व्हॉटस् अ‍ॅप, मेसेजचा परिणाम शुभेच्छापत्रांवर नक्कीच झाला आहे; पण इंग्रजीच्या कार्डला आजही मागणी आहे. यंदा इंग्रजीतील कार्डचे नवनवीन डिझाईन बाजारात आले आहेत. मात्र, मराठीतील एकही नवीन कार्ड बाजारात आले नाही. मागणी खूप कमी झाल्याने आता तर बहुतांश विक्रेत्यांनीही मराठी शुभेच्छापत्र ठेवणे बंद केले आहे.