Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 07:11 IST2025-09-01T07:10:17+5:302025-09-01T07:11:16+5:30
Maratha Kranti Morcha: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव विविध वाहनांनी मुंबईत आले

Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव विविध वाहनांनी मुंबईत आले आहेत. काहीजण दुचाकीने, काहीजण चारचाकीने तर काहीजण रेल्वेने आले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील संपतराव हाके व परभणी येथील संदीप गव्हाणे हे चक्क सायकलवरून मुंबईत दाखल झाले आहेत. हाके यांनी सुमारे ४०० किमीचे अंतर, तर गव्हाणे यांनी सुमारे साडेपाचशे किमीचे अंतर सायकलने कापत मुंबई गाठली.
पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील बहिरेवाडी येथून हाके हे अनवाणी पायाने सायकल चालवत मुंबईत आले. सायकलला मागण्यांचे बॅनर लावले आहेत. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यानंतरच ते शिवनेरीला जाणार आहेत. अनेक आंदोलक त्यांच्यासोबत सेल्फी काढत आहेत. परभणी ते मुंबई प्रवास सायकलने करणारे गव्हाणे यांनादेखील इतर मराठा आंदोलकांकडून प्रेम मिळत आहे. वाटेवर अनेकांना मराठा आरक्षण लढ्याबाबत माहिती देत आल्याचे गव्हाणे म्हणाले.