मराठा, पटेल आरक्षणासाठी हार्दिकसोबत लढू!

By Admin | Updated: September 2, 2015 09:15 IST2015-09-02T01:30:12+5:302015-09-02T09:15:23+5:30

आरक्षणावर पटेल व मराठा समाजाची मागणी सारखीच असल्याने हार्दिकसोबत एकत्र लढा उभा करू, अशी भूमिका मराठा सेवा संघाचे संस्थापक

Maratha, Patel will fight with hearty reservation! | मराठा, पटेल आरक्षणासाठी हार्दिकसोबत लढू!

मराठा, पटेल आरक्षणासाठी हार्दिकसोबत लढू!

सांगली : आरक्षणावर पटेल व मराठा समाजाची मागणी सारखीच असल्याने हार्दिकसोबत एकत्र लढा उभा करू, अशी भूमिका मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी मंगळवारी येथे मांडली.
हार्दिक पटेल महाराष्ट्रात आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू. महाराष्ट्रात मोठा कार्यक्रम घेऊ. गुजरातमध्ये पटेल समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, अशी हार्दिक यांची मागणी आहे. महाराष्ट्रात मराठा सेवा संघाचीही मराठा समाजाबाबत अशीच मागणी आहे, असे खेडेकर यांनी सांगितले.
खेडेकर म्हणाले की महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा विषय मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यादृष्टीने संपला आहे. पण पुन्हा विषय निघाला तर आम्ही ताकदीने बाजू मांडू. अकोल्यात २४ ते २६ डिसेंबरमध्ये अधिवेशन आयोजित केले आहे. त्यात सर्वधर्म व जातीच्या प्रतिनिधींचा महासंवाद होणार आहे.

Web Title: Maratha, Patel will fight with hearty reservation!