शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात २५ सप्टेंबरला मराठा मोर्चा

By admin | Updated: September 15, 2016 01:28 IST

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार करणाऱ्या नराधमांवर राज्य शासनाने योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ताबडतोब या खटल्याची सुनावणी खास जलदगती न्यायालयात सुरु करावी

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार करणाऱ्या नराधमांवर राज्य शासनाने योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ताबडतोब या खटल्याची सुनावणी खास जलदगती न्यायालयात सुरु करावी. या गुन्ह्यातील नराधमांना फाशीची शिक्षा ठोठवण्यात यावी या प्रमुख मागणी सह इतर मागण्यांसाठी रविवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी विराट मराठा मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा तर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.गेल्या काही दिवसांत बीड, परभणी, नाशिक या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला. यावेळी कोणती घोषणा नाही की कुठला पक्ष अथवा संघटनेचे बोर्ड नाहीत, फक्त हातात भगवे ध्वज घेऊन हा मोर्चा काढला जातो.समाजाच्या वतीने आत्तापर्यंत राज्यातील ७ ठिकाणी मोर्चे काढण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर आता पुण्यात मोर्चा काढण्यासाठी मराठा समाजातील लोकांनी तरुणांसह अनेकांनी पुढाकार घेतला आहे. रविवारी सकाळी मोर्चाला १०.३० वाजता डेक्कन जिमखाना येथील मुठा नदीच्या पात्राच्या मोकळ््या मैदानापासुन प्रारंभ होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका टॉकीज चौक, लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौक, संत कबीर चौक, नाना पेठ, क्वॉर्टर गेट, हॉटेल शांताई मार्गे लाल देऊळ, नवीन जिल्हा परिषद, हॉटेल ब्ल्यु नाईल मार्गे विधान भवनावर मूक मोर्चा नेण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे मोर्चे निघत असुनही सरकारकडून त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही. त्याचबरोबर कोपर्डी प्रकरणाची तपासाची गती समाधानकारक नाही असेही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच, काही जणांकडून? अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे असा चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहचत आहे परंतु मराठा समाजाचा अ‍ॅट्रॉसिटीला विरोध नसून त्यातील काही जाचक अटीला विरोध आहे. अ‍ॅट्रॉसिटी रद्द न होता त्यामध्ये योग्य ती सुधारणा व्हावी अशी मागणी मराठा समाज क्रांती मोचार्ची आहे.(प्रतिनिधी)