शहरं
Join us  
Trending Stories
1
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
2
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
3
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
4
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
5
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
6
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
7
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
8
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राजकीय राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
9
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
10
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
11
दिवाळी पाडवा २०२५: १० राशींना गुड न्यूज, समस्या संपतील; भाग्योदय-भरभराट, इच्छापूर्तीचा काळ!
12
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
13
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
14
Ashwin Amavasya 2025:अमावस्या तिथीला अमावस्याच का म्हणतात? वाचा ही रहस्य उलगडणारी कथा
15
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
16
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
17
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
18
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
19
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
20
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)

Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 08:08 IST

Maratha Kranti Morcha: चार दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या आंदोलकांचा आकडा ६० हजारांवर पोहोचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: चार दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या आंदोलकांचा आकडा ६० हजारांवर पोहोचला आहे. आंदोलकांनी आणलेल्या चारशे गाड्या आझाद मैदानाजवळील रस्त्यांवर दुतर्फा उभ्या आहेत, तर आंदोलकांच्या मुंबईत दहा हजार गाड्या आल्याचा अंदाज आहे. त्यापैकी ५ हजार गाड्या परत गेल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सोमवारी आंदोलकांची अनेक वाहने मुंबईच्या वेशीवर अडवण्यात आली. 

मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवर असलेली आंदोलकांची वाहने हटवण्यासाठी पोलिस मराठा समन्वयकांची मदत घेत होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही हजारो आंदोलक मुंबईकडे येत होते. मात्र, आंदोलकांच्या गाड्या पोलिसांनी मुंबईच्या वेशीवरच थांबविल्या. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसले. गेल्या चार दिवसांत १० हजारांहून अधिक वाहने मुंबईत धडकली. 

मुंबईत सोमवारी कसे होते चित्र?मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी, ‘एक तर गुलाल उधळेन, नाही तर माझी अंत्ययात्रा निघेल‘ असे म्हटल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले होते. चौथ्या दिवशी आंदोलकांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. दक्षिण मुंबईतील सीएसएमटी) स्थानकासमोरील डी. एन. रोडवर ५० आंदोलक रस्त्यावर उतरले होते. 

अधिकाऱ्यांसह २००० पोलीस तैनात बंदोबस्तासाठी सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांच्यासह ५ अपर पोलिस आयुक्त, ९ पोलिस उपायुक्त आणि २००० पोलिस अधिकारी, अंमलदार, तसेच एसआरपीएफ, सेंट्रल आर्म पोलिस फोर्सच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे; पण बळाचा वापर न करता आंदोलकांना समजावून गर्दी नियंत्रित केली जात आहे. आझाद मैदान, सीएसएमटी परिसरातच ३०० ते चारशे वाहने पार्क करण्यात आली आहेत. त्यात खाण्या-पिण्याची शिदोरी घेऊन येणाऱ्या वाहनांची भर पडताना दिसत आहे. पोलिसांकडून ही वाहने हटविण्याबाबत समन्वयकांच्या मदतीने विनंती करण्यात येत आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रMumbai policeमुंबई पोलीसMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा