Manmad Railway: धडकी भरवणारी घटना! धावत्या ट्रेनखाली सापडले साधूबाबा; अंगावरुन गेले 10 डब्बे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 03:43 PM2022-04-12T15:43:44+5:302022-04-12T15:44:15+5:30

Manmad Railway: मनमाड रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे. ट्रॅक ओलांडताना एक साधूबाबा रेल्वेखाली सापडले, यावेळी ट्रेनचे 10 डब्बे त्यांच्या अंगावरुन गेले.

Manmad Railway Station, Sadhu baba lies under superfast humsafar train | Manmad Railway: धडकी भरवणारी घटना! धावत्या ट्रेनखाली सापडले साधूबाबा; अंगावरुन गेले 10 डब्बे

Manmad Railway: धडकी भरवणारी घटना! धावत्या ट्रेनखाली सापडले साधूबाबा; अंगावरुन गेले 10 डब्बे

Next

मनमाड: महाराष्ट्रातील मनमाड रेल्वे स्थानकावरुन एक धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आला आहे. एक साधू रेल्वे ट्रॅक ओलांडून फलाट क्रमांक 4च्या दिशेने जात होता, इतक्यात समोरुन एक ट्रेन आली. अशा परिस्थितीत घाबरलेला साधूबाबा जीव वाचवण्यासाठी रुळांवर झोपी गेला. साधारण दीड मिनिटांत ट्रेनचे 10 डब्बे साधूच्या अंगावरुन गेले, पण सुदैवाने त्यांना खरचटलेही नाही. 

या घटनेचा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी फोनवर शूट करुन व्हायरल केला. ही घटना सोमवारी दुपारी घडल्याचे बोलले जात आह. साधूबाबा रुळावर पडलेले पाहून सुपरफास्ट हमसफर एक्सप्रेसच्या चालकानेही ट्रेनचे आपत्कालीन ब्रेक लावले. ट्रेनखाली झोपलेल्या साधूला बाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

साधूची ओळख पटू शकली नाही
दिड मिनिटानंतर ट्रेन थांबल्यानंतर एका व्यक्तीने त्यांना रुळांवरुन बाहेर काढले. तिथे काहीवेळ थांबल्यानंतर साधू तेथून गायब झाला. त्यामुळेच त्याची ओळख पटू शकली नाही. रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांनीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप काहीही सापडले नाही.

भुसावळमध्येही अशीच घटना घडली 
गेल्या आठवड्यात भुसावळ रेल्वे स्टेशनवरही अशाच प्रकारची घटना घढली. सकाळी 7 वाजता डाऊन पाटलीपुत्र एक्स्प्रेस निघाली असता एका प्रवाशाने चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडला. घटनास्थळी कर्तव्यावर असलेले रेल्वे पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक कवळे यांनी त्याला पकडल्याने प्रवाशाचा जीव वाचला. 

Read in English

Web Title: Manmad Railway Station, Sadhu baba lies under superfast humsafar train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.