Dombivli Murder: धक्का लागल्यामुळे झालेल्या वादातून एकाची हत्या, डोंबिवलीतील घटना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 15:13 IST2025-11-20T15:10:48+5:302025-11-20T15:13:05+5:30
Dombivli Crime: क्षुल्लक कारणावरून झालेला वाद कोणत्या थराला जाऊ शकतो, हे सांगता येणार नाही.

Dombivli Murder: धक्का लागल्यामुळे झालेल्या वादातून एकाची हत्या, डोंबिवलीतील घटना!
डोंबिवली: क्षुल्लक कारणावरून झालेला वाद कोणत्या थराला जाऊ शकतो, हे सांगता येणार नाही. धक्का लागला म्हणून झालेल्या वादात एकाला जीव गमवावा लागला. वादात चाकूने भोसकून तरुणाची हत्य करणाऱ्या आहे. नवी मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करणारा आकाश सिंग (३८) हा भाऊ बादल आणि मित्रांसह ९ नोव्हेंबरला एमआयडीसी फेज २ भागातील मालवण किनारा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. तेथे अक्षय वागळे याला आकाशचा धक्का लागल्याने वाद झाला. चुकून धक्का लागला, असे आकाश आणि त्याच्याबरोबरचे अक्षयला समजावून सांगत होते; परंतु तो काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
त्याने मित्र प्रतीकसिंग चौहान याला फोन लावून बोलावून घेतले. प्रतीकसिंग नीलेश ठोसर, अमर महाजन, लोकेश चौधरी आणि अतुल कांबळे या मित्रांना घेऊन हॉटेलवर आला. त्यांनी आकाशला बाहेर बोलावून त्याला मारहाण करायला सुरुवात केली. याच वेळी प्रतीकसिंगबरोबर आलेल्या अमरने त्याच्याकडील चाकू काढला आणि आकाशच्या छातीत खुपसला आणि मानेवर वार केल्याने त्याचा मृत्यू झाला.
तपासासाठी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, एसीपी सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयपालसिंह राजपूत, लक्ष्मण साबळे, मनीषा वर्षे, सहायक पोलिस निरीक्षक संपत फडोळ, महेश राळेभात, सागर चव्हाण यांचे विशेष पथक नेमले. या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे नाशिक शहर पोलिसांच्या मदतीने सहाही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.