मल्लिकाजरुन खर्गे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते

By Admin | Updated: June 3, 2014 01:27 IST2014-06-03T01:27:29+5:302014-06-03T01:27:29+5:30

माजी रेल्वेमंत्री मल्लिकाजुर्न खर्गे लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते असतील़ ज्येष्ठ नेते कमलनाथ व पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हेही गटनेते पदाच्या स्पर्धेत होते.

Mallikarjun Kharge, Congress leader in the Lok Sabha | मल्लिकाजरुन खर्गे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते

मल्लिकाजरुन खर्गे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते

>कमलनाथ, अमरिंदरसिंग यांचा दावा सोनियांनी नाकारला
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
माजी रेल्वेमंत्री मल्लिकाजुर्न खर्गे लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते असतील़ ज्येष्ठ नेते कमलनाथ व पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हेही गटनेते पदाच्या स्पर्धेत होते. पक्ष सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी लोकसभा गटनेतेपदी खर्गे यांच्या नावाची घोषणा केली.
प्रारंभी काँग्रेसच्या अंतर्गत गोटात राहुल गांधी यांना लोकसभेचे गटनेतेपद देण्याबाबत भर दिला जात होता. दुसरीकडे कमलनाथ आणि अमरिंदर सिंग यांनीही दावा केला होता. आपण सभागृहात पक्षाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य असल्याचा युक्तिवाद कमलनाथ यांनी केला होता, तर अमरिंदर सिंग यांनी मी भाजपा नेते अरुण जेटली यांचा पराभव करून सभागृहात पोहोचलो असल्याने राहुल गांधी हे पद स्वीकारत नसतील तर मला मिळायला हवे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती़ काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मात्र कमलनाथ व अमरिंदर सिंग यांचा युक्तिवाद नाकारत खर्गे यांच्या नावावर मोहर उमटविली. युवा काँग्रेस नेते राजीव सातव यांनी राहुल गांधी यांना सभागृहाचा नेता बनविण्यासाठी मोहीम सुरू केली होती़
 
मोठी जबाबदारी
मी देशाच्या व्यापक हितासाठी प्रामाणिकपणो आणि गांभीर्याने माझी जबाबदारी पार पाडेन. पक्षाध्यक्षांनी माङयावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. 
- मल्लिकाजुर्न खर्गे

Web Title: Mallikarjun Kharge, Congress leader in the Lok Sabha