शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

आपले गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करा

By admin | Updated: August 24, 2016 20:36 IST

कुटुंबस्तर संवाद अभियानात गृहभेटीच्या माध्यमातून शौचालय नसलेल्या कुटुंबाला अस्वच्छतेमुळे आरोग्यावर होणारे परिणाम चांगल्या पद्धतीने समजावून सांगा

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 24 : कुटुंबस्तर संवाद अभियानात गृहभेटीच्या माध्यमातून शौचालय नसलेल्या कुटुंबाला अस्वच्छतेमुळे आरोग्यावर होणारे परिणाम चांगल्या पद्धतीने समजावून सांगा. आपले गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी गावातील प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी केले.कुटुंबस्तर संवाद अभियान अंतर्गत आयोजित केलेल्या उत्तर सोलापूर तालुकास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे , उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती सुरेखा पाटील, गटविकास अधिकारी सुरेवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एम.कुलकर्णी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ गायकवाड , संवाद तज्ज्ञ सचिन सोनवणे आदी उपस्थित होते. जि़ प़ अध्यक्षा जयमाला गायकवाड पुढे म्हणाल्या, एखादे गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी गावातील सरपंच, ग्रामसेवक यांच्याबरोबरच शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा, बचत गटाच्या महिला यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. गावात एखादी व्यक्ती ही गाव, समाज बदलू शकते, त्यामुळे गावात कुटुंबस्तर संवाद अभियानात गृहभेटीच्या माध्यमातून शुद्ध पाणी व शौचालय वापराबाबत प्रबोधन करावे. उत्तर सोलापूर तालुका येत्या दोन आॅक्टोबर २०१६ पर्यंत १०० टक्के हागणदारीमुक्त करावा, असे आवाहन अध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी केले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे म्हणाले, गाव करी ते राव काय करी याप्रमाणे गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रत्येकाने शिवधनुष्य उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी गावात वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी ग्रामस्थांना शौचालय कशासाठी बांधायचे हे गृहभेटीच्या माध्यमातून त्यांच्या मनावर चांगल्या पद्धतीने बिंबवा. कारण एखाद्या घरात आजारपणावर वर्षाला सुमारे ३० हजार रुपये खर्च होतात. उत्तर सोलापूर तालुका येत्या दोन आॅक्टोबर २०१६ पर्यंत १०० टक्के हागणदारीमुक्तकरण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे सांगितले. यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी कुटुंबस्तर संवाद अभियान अंतर्गत गृहभेटी कशा पद्धतीने कराव्यात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.