शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक इन इंडिया’ची कामगारांवर गदा?

By admin | Updated: January 25, 2015 01:06 IST

कारखानदारांना प्रोत्साहित करण्यासाठी कामगार कायद्यांची अनेक बंधने शिथिल करण्याचा प्रस्ताव राज्याच्या कामगार मंत्रालयाने केला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात सहभागी होण्यास उद्योजक आणि कारखानदारांना प्रोत्साहित करण्यासाठी कामगार कायद्यांची अनेक बंधने शिथिल करण्याचा प्रस्ताव राज्याच्या कामगार मंत्रालयाने केला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.सूत्रांनुसार इंडस्ट्रियल डिस्प्युट््स अ‍ॅक्ट, फॅक्टरीज अ‍ॅक्ट आणि कॉन्ट्र्ॅक्ट लेबर अ‍ॅक्ट यासारख्या केंद्रीय कायद्यांमध्ये राज्यापुरत्या सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. अर्थात या दुरुस्त्या आधी राज्य मंत्रिमंडळाने व नंतर विधिमंडळाने मंजूर कराव्या लागतील. त्यानंतर राष्ट्रपतींची संमती मिळाल्यावरच त्या लागू होऊ शकतील.कारखानदारीला प्रोत्साहन मिळावे यासाठी जुनाट कामगार कायद्यांमधील जाचक तरतुदी शिथिल करण्याचे धोरण भारतीय जनता पार्टीने याआधीच जाहीर केले आहे. त्यानुसार राजस्थान आणि मध्य प्रदेश या भाजपाशासित राज्यांच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रातीही कायद्यांमध्ये अशा दुरुस्त्या करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.या सुधारणा लागू झाल्या तर महाराष्ट्रातील ९५ टक्के कारखान्यांच्या मालकांना सरकारच्या पूर्वसंमतीखेरीज कारखाना बंद करण्याची अथवा कामगारांना ‘ले-आॅफ’ देण्याची अधिक सुलभपणे मुभा मिळेल. राज्यात सुमारे ४१ हजार औद्योगिक आस्थापने आहेत. त्यापैकी सुमारे ३९ हजार कारखान्यांना या प्रस्तावित सुधारणांचा लाभ होऊ शकेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक औद्योगिकरण झालेले राज्य असून, वर्ष २०१३-१४ मध्ये राज्यातील कारखानदारीचे एकूण उत्पादन २,२६७ अब्ज रुपयांचे झाले होते. सध्याच्या कायद्यांनुसार, आर्थिकष्ट्या परवडत नसल्याने उत्पादन बंद झालेले कारखाने कायमचे बंद करणे अथवा ते पुन्हा सुरू व्हावेत यासाठी कामगार कपात करणेयावर अनेक बंधने आहेत. बदललेल्या स्पर्धात्मक जगात टिकाव धरायचा असेल तर उद्योग चालविण्याचे किंवा तो बंद करण्याचे स्वातंत्र्य असायला हवे, असे उद्योजक कारखानदारांचे म्हणणे आहे. मात्र यामुळे कामगारांच्या रोजगारावर आणि नोकरीच्या स्वातंत्र्यावर गदा येणार असल्याने कामगार संघटनांचा या प्रस्तावित कायदा दुरुस्तीला विरोध आहे. (विशेष प्रतिनिधी) इंडस्ट्रियल डिस्प्युट््स अ‍ॅक्ट१सध्या १०० किंवा त्याहून अधिक कामगार नोकरीस असलेला कारखाना मालक सरकारच्या पूर्वसंमतीशिवाय बंद करू शकत नाही किंवा कामगार कपातही करू शकत नाही. ही मर्यादा वाढवून ३०० कामगार करण्याचा प्रस्ताव आहे.२सध्या सरकारने संमती दिल्यावर केल्या जाणाऱ्या कामगार कपातीत कपात केलल्या कामगारास नोकरीच्या प्रत्येक वर्षासाठी १५ दिवसांच्या पगाराएवढी भरपाई द्यावी लागते. ही रक्कम दुप्पट करून ३० दिवसांच्या पगाराएवढी करण्याचा प्रस्ताव आहे.३याहून दुप्पट म्हणजे झालेल्या नोकरीच्या प्रत्येक वर्षासाठी ६० दिवसांचा पगार भरपाई म्हणून दिला जाणार असेल, तर ३०० हून अधिक कामगार असलेल्या कारखान्यांनाही सरकारच्या पूर्वसंमतीशिवाय कामगार करू देण्याचा प्रस्ताव फॅक्टरीज अ‍ॅक्टच्सध्या विजेवर चालणाऱ्या व किमान १० कामगार असलेल्या किंवा विजेशिवाय चालणाऱ्या व किमान २० कामगार असलेल्या कारखान्यांना या कायद्यानुसार सुरक्षा उपाय व कामाच्या अटींची अनेक बंधने आहेत.च्कामगारसंख्येची ही किमान मर्यादा वाढवून विजेवर चालणाऱ्या कारखान्यांसाठी २० तर विजेशिवाय चालणाऱ्या कारखान्यांसाठी ४० अशी करण्याचा प्रस्ताव आहे.कॉन्ट्रॅक्ट लेबर अ‍ॅक्ट : सध्या या कायद्यानुसार २० किंवा त्याहून अधिक कंत्राटी कामगार असलेल्या उद्योग/ कारखान्यांना सरकारकडे नोंदणी करणे सक्तीचे आहे. ही मर्यादा वाढवून ५० किंवा त्याहून अधिक कामगार अशी करण्याचा प्रस्ताव आहे.