मुंबई-गोवा महामार्गावर लांजामध्ये भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 09:36 IST2018-12-08T09:32:51+5:302018-12-08T09:36:15+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे लक्झरी बसच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. 

Major accident in Lanja on Mumbai-Goa highway, two deaths | मुंबई-गोवा महामार्गावर लांजामध्ये भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर लांजामध्ये भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

ठळक मुद्देभीषण अपघातात दोन जणांचा मृत्यूलक्झरी बसची दुधाच्या गाडीला जोरदार धडक

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे लक्झरी बसच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. लांजातील रखांगी प्लाझासमोर दुधाच्या गाडीतून दूध उतरुन तेच दूध दुसऱ्या गाडीत भरण्याचे काम सुरू होते. दोन्ही गाड्या एकमेकांकडे पाठ करुन उभ्या होत्या. त्यावेळी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसने दुधाच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यात मुबारक आब्बास सारंग (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या कर्मचारी अपघातात गंभीर जखमी झाला होता. या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Major accident in Lanja on Mumbai-Goa highway, two deaths