शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

जळीत हत्याकांडात पोलिस उपनिरीक्षक निघाला मुख्य सूत्रधार

By admin | Updated: September 12, 2016 21:26 IST

तालुक्यातील पोहरादेवी शिवारातील काकडशिवणी शेतशिवारात २६ मे २०१६ रोजी अनोळखी इसमाचे प्रेत अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आले.

ऑनलाइन लोकमत

मानोरा, दि. १२ -  तालुक्यातील पोहरादेवी शिवारातील काकडशिवणी शेतशिवारात २६ मे २०१६ रोजी अनोळखी इसमाचे प्रेत अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आले. प्रेम विवाहातून घडलेल्या या घटनेचा उलगडा पाच महिन्यानंतर झाला असून घटनेचा मुख्य सूत्रधार आसेगांव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षक तुकाराम विठ्ठल ढोके (वय ५२ वर्षे) असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी ढोकेसह पाच आरोपींना अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ढोकेच्या मुलीने १ एप्रिल २०१६ रोजी अमरावती येथील आर्य समाज मंदिरात सचिन प्रभुदयाल सिमोलीया (रा.फ्रेजरपुरा, गांधीनगर, अमरावती) याच्यासोबत प्रेमविवाह केला. हीच बाब ढोके परिवारात खदखदत होती. 
 
दरम्यान, सचिन व मुलगी शिवाणी या दोघांना घेवून  ढोके परिवार पुसदपर्यंत सोबत होते. त्यानंतर आरोपी तुकाराम ढोके व तुषार तुकाराम ढोके (रा.कारंजा) आणि प्रविण दत्तराम आगलावे (रा.पुसद) या तिघांनी पोहरादेवी परिसरातील काटेरी फास व पराटयामध्ये मृतदेह पेटवून दिला. परंतु मृतदेह अर्धवट जळाला. 
 
तुकाराम ढोकेची पत्नी पुष्पा ढोके वय (वय ४५ वर्षे) हिला घटनेची संपूर्ण माहिती होती. शिवाणी ढोके ही मृतक सचिनसोबत पुसदपर्यंत प्रवासात होती. असे असताना तीने सदर गंभीर बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली नाही. मात्र, पोलिस तपासात तुकाराम ढोकेसह इतर चार जणांनीच सचिनचा खून केल्याची बाब निष्पन्न झाली. त्यावरून संबंधित पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांना मानोरा न्यायालयात हजर केले असता १७ सप्टेंबर २०१६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.