शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीच ओबीसी हिताची मारेकरी; फडणवीस यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 06:57 IST

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, अशी इच्छाच या सरकारची नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला. 

ठाणे  : सध्याचे सरकार हे ओबीसी विरोधी आहे. ओबीसींच्या योजना बंद करण्यात आल्या आहेत. त्यांना कोणत्याही योजनांचा लाभ दिला जात नाही. ओबीसी राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी महाविकास आघाडीच असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली.भाजपच्या ओबीसी सेलच्यावतीने येथे आयोजित ओबीसी जागर अभियानामध्ये ते बोलत होते. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, अशी इच्छाच या सरकारची नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला. १५ डिसेंबर २०१९ रोजी नवीन सरकारच्या काळात आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने राज्य मागास आयोग स्थापन करा, असे सांगितले होते. त्यानुसार न्यायालयात आठ वेळा सुनावणी होऊनही त्याची माहिती सध्याच्या सरकारने दिलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने ५ मार्च २०२१ रोजी राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द करीत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याऐवजी हे सरकार आंदोलन करत बसले, आता तब्बल १५ महिन्यांनंतर या सरकारने अध्यादेश काढला आहे. ओबीसींचा चुकीचा तपशील केंद्राकडे सादर करण्यात आला होता. केंद्राने त्यानुसार चुकीची माहिती आल्याचे सांगत वेळ वाढवून मागितली होती. किमान माहिती तरी योग्य पद्धतीने दिली असती तर ही वेळ आली नसती, असेही ते म्हणाले.’मुख्यमंत्र्यांचे काम शरद पवारच करतात’  जे विरोधी बाकावर बसूनही महाराष्ट्रासाठी काम करीत आहेत, त्यांच्यात मी मुख्यमंत्री असल्याची भावना निर्माण होत असेल, तर त्यात गैर काहीच नाही. मात्र, सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कोणतेच काम नाही. त्यांचे काम शरद पवारच करतात, असा टोला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOBC Reservationओबीसी आरक्षण