ZP Election 2020 : हवा बदल रही है! नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालांवरून भुजबळांचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 15:06 IST2020-01-08T14:40:49+5:302020-01-08T15:06:33+5:30
नागपूर जिल्हा परिषदेचा निकाल हा नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

ZP Election 2020 : हवा बदल रही है! नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालांवरून भुजबळांचा भाजपाला टोला
मुंबई - नागपूरजिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाची मोठी पीछेहाट झाली असून, काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य सरकारमधील अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागपूरजिल्हा परिषदेच्या निकालांवरून भाजपाला टोला लगावला आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालावरून हवा बदलत आहे, असे दिसत आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपाची सत्ता होती. दरम्यान, नागपूरमधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाने जोर लावला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र तरीही भाजपाला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला.
नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५८ जि.प.सर्कल पैकी २८ सर्कलचे निकाल जाहीर झाले आहेत. यात २३ जागावर कॉँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने विजय मिळविला आहे. यात कॉँग्रेसने १९ तर राष्ट्रवादीने चार जागावर विजय मिळविला आहे. भाजप चार जागावर विजयी झाली आहे तर एका जागेवर शेकापला विजय मिळाला आहे.नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली होती. यात कॉँग्रेसने ४२ तर राष्ट्रवादीने १६ जागेवर निवडणूक लढविली होती.
ZP Election 2020; नागपूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का; कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेकडे
ZP Election 2020: धुळ्यात भाजपाची सत्तेकडे वाटचाल, १९ जागांवर विजय
नागपूर जिल्हा परिषदेचा निकाल हा नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापले होते. बावनकुळेंचे तिकीट कापल्याचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीत भाजपला बसला होता. आता जिल्हा परिषद निवडणुकीत तो मोठ्या प्रमाणात बसताना दिसतो आहे.