शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

१ मेपर्यंत महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 03:33 IST

एकदाच वापरता येण्याजोग्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद

मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, लोक सहभागाशिवाय प्लास्टिक बंदीचे उद्दिष्ट गाठता येणार नाही. यासाठी लोकांनीही प्लास्टिक वापरण्याची सवय आणि सोय बदलली पाहीजे, अशी भावना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत व्यक्त केली. येत्या १ मे रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेला ५० वर्ष होत आहेत. तोपर्यंत एकदाच वापरता येण्याजोग्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्यात २०१८ साली प्लास्टिक व थर्माकॉल बंदीचा कायदा करण्यात आला. मात्र, तरीही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचा मुद्दा काँग्रेस आमदार रामहरी रुपनवर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मांडला. काही सदस्यांनी जाड प्लास्टिक पिशव्यांना परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, प्लास्टिक पिशव्यांमुळे कचरा आणि नाले तुंबण्याच्या समस्या निर्माण होत असल्याने अशी परवानगी देता येणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.पीओपी मृर्तींवर बंदी नाहीराष्ट्रवादीच्या आ. विद्या चव्हाण यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी पीओपी मूर्तींवर बंदी आणणार का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर, हा प्रश्न भावनेशी निगडित असल्याने इतक्या लवकर बंदी आणता येणार नाही. मात्र गणपती सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकॉलचे मखर बंद करण्यात सरकारला यश आले आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.पाण्याच्या बाटल्यांना सूटप्लास्टिक बंदीतून पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बाटल्या वगळण्यात आले आहे. या बाटल्यांचा पुर्नवापर करता येतो. तसेच त्याला अद्याप पर्याय निर्माण झाला नसल्याने त्या आताच बंद करता येणार नाही असेही, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी