शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाराष्ट्रात कोणीही दुष्यंत चौटाला नाही; शिवसेनेचा भाजपावर बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 12:50 PM

Maharashtra Election Result 2019: शिवसेना, भाजपाकडून दबावाचं राजकारण जोरात

मुंबई: महाराष्ट्रात कोणीही दुष्यंत चौटला नाही, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला सूचक इशारा दिला आहे. ज्याचे वडील तुरुंगात आहेत असे दुष्यंत चौटाला महाराष्ट्रात नाहीत, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना सत्तेच्या समान वाटपावर ठाम असल्याचा संदेश त्यांनी या इशाऱ्यातून दिला आहे.हरयाणात बहुमतापासून दूर राहिलेल्या भाजपानं निकालानंतर दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीशी आघाडी केली. यानंतर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले दुष्यंत चौटाला यांचे वडील अजय चौटाला फर्लोवर बाहेर आले. यावरून शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला. 'महाराष्ट्रात कोणीही दुष्यंत चौटाला नाहीत, ज्याचे वडील तुरुंगात आहेत. आम्ही महाराष्ट्रात सत्याचं राजकारण करतो. त्यामुळे जर कोणी आम्हाला सत्तेपासून दूर ठेवत असेल, तर त्याला सत्याचं राजकारण म्हणता येणार नाही. सध्या काय घडतंय आणि माणसं किती खालच्या थराला जात आहेत, याकडे आमचं लक्ष आहे,' असं म्हणत राऊत यांनी भाजपाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. त्याआधी काल शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचले.  शिवसेना, भाजपाचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपाला लोकसभेवेळी निश्चित झालेल्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. भाजपा आम्हाला दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरवू शकत नाही. भाजपानं आमच्यासोबत करार केलेला आहे. त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. ते आम्हाला आश्वासन देऊन मागे हटू शकत नाही, अन्यथा आम्ही दुसऱ्या पर्यायांचा विचार करू, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊत