शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

महाराष्ट्र निवडणूक 2019: सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं...; संजय राऊतांकडून 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 12:53 PM

Maharashtra Election Result 2019 टीका होऊ लागताच संजय राऊत यांचा सूर बदलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यात सर्वाधिक प्रकाशझोतात आलेली व्यक्ती म्हणजे शिवसेना नेते खासदार संजय राऊत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून संजय राऊतभाजपावर अक्षरश: तुटून पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपाला लक्ष्य करत आहेत. मात्र आता त्यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे.विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 11 दिवस उलटले तरीही राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिलेला असताना सत्तेच्या वाटपावरुन सुरू असलेल्या संघर्षामुळे शिवसेना, भाजपामधील चर्चा जवळपास बंद झाली आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत वारंवार भाजपावर तोफ डागत असल्यानं दोन्ही पक्षांमधील दरी वाढली आहे. त्यामुळेच त्यांच्यावर टीकादेखील होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी ट्विटरवर दुष्यंत कुमार यांची कविता शेअर केली आहे. “सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।”, या ओळी राऊत यांनी शेअर केल्या आहेत. त्यामुळे युतीमध्ये व्हिलन ठरू नये, यासाठी राऊत कामाला लागले आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शिवसेनेला मिळालेल्या वागणुकीवर कोणीतरी बोलायला हवं, म्हणून मी बोलतोय. केवळ गोंधळ निर्माण करण्याचा माझा हेतू नाही, अशा अर्थानं या ट्विटकडे पाहिलं जात आहे.

पत्रकार परिषदा, सामनाचे अग्रलेख यांच्या माध्यमांमधून भाजपावर टीकेची झोड उठवणाऱ्या संजय राऊत यांना आता 'तरुण भारत'मधून प्रत्युत्तर मिळू लागलं आहे. काल तरुण भारतनं राऊत यांच्यावर अग्रलेख लिहित त्यांचा समाचार घेतला. त्यात त्यांनी राऊत यांना बेताल, विदूषक म्हटलं होतं. आजच्या अग्रलेखात तरुण भारतनं दरबारी राजकारणावरून उद्धव ठाकरेंना सल्ला देताना राऊत यांच्यावर शरसंधान साधलं. दरबारी राजकारण करू लागल्यावर राजाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, असं तरुण भारतनं आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना