शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकालः अजित पवारांची 'ती' धमकी खरी ठरणार? शिवसेनेचा 'विजय' धोक्यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 11:20 IST

Maharashtra Election Result 2019 लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी दिला होता इशारा

मुंबई: राज्यभरात मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजपा सध्या पहिल्या क्रमाकांवर आहे. मात्र त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. तर शिवसेनेच्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढताना दिसत आहेत. मात्र पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे पिछाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी शिवतारे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. त्यावेळी पवार यांनी शिवतारेंना दिलेली धमकी खरी ठरताना दिसत आहे. पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप 1366 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतारे पिछाडीवर पडले आहेत. पुरंदर लोकसभेच्या बारामती मतदारसंघात येतो. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे रिंगणात होत्या. त्यावेळी पुरंदरमध्ये मिळणाऱ्या मताधिक्क्यावरुन शिवतारे आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं होतं. त्यावेळी 'विधानसभेला कसा निवडून येतो तेच बघतो', अशा शब्दांत अजित पवारांनी शिवतारेंना इशारा दिला होता. मतमोजणीच्या प्राथमिक टप्प्यांमध्ये पवारांचा हा इशारा खरा ठरताना दिसत आहे. अजित पवारांविरोधात बारामतीत भाजपानं वंचितमधून आलेल्या गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र पडळकर सध्या तब्बल 50 हजारांपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे अजित पवारांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. शरद पवारांचे राजकीय वारसदार मानल्या जाणाऱ्या रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून आघाडी मिळवली आहे. याठिकाणी भाजपाचे नेते आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे पिछाडीवर आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019purandar-acपुरंदरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाSupriya Suleसुप्रिया सुळे