शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे १५ नेते हाणून पाडणार भाजपाचे 'फेक नॅरेटिव्ह'; टीममध्ये कोण-कोण? काय आहे 'प्लॅन'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 21:43 IST

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024, Congress vs BJP: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे

Congress vs BJP: सत्ताधारी पक्षाकडून 'फेक नरेटिव्ह' पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. आयटी सेल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो आणि व्हिडीओ एडिट करून मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवत आहेत. राज्यातील जनतेला सत्य कळावे आणि सत्ताधाऱ्यांच्या खोट्या प्रचाराला पायबंद घातला जावा, यासाठी काँग्रेस 'अँक्शन मोड'मध्ये आली आहे. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार 'फेक नरेटिव्ह' हाणून पाडण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने १५ नेते आणि प्रवक्त्यांच्या टीमकडे दिली आहे.

काँग्रेसची 'ती' १५ नेतेमंडळी कोण?

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष व गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अ‍ॅड. यशोमती ठाकूर, अमित देशमुख , डॉ. विश्वजीत कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, चरण सिंग सप्रा या १५ जणांचा या टीममध्ये समावेश आहे.

काँग्रेसचा 'प्लॅन' काय?

काँग्रेस पक्षातील अनुभवी आणि ज्येष्ठ अशा १५ नेते व प्रवक्ते मंडळी यांना भाजपाशी दोन हात करण्याचे कार्य सोपवण्यात आले आहे. ही सर्व मंडळी पत्रकार परिषदा घेऊन आणि माध्यमांशी संवाद साधून काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेपर्यंत घेऊन जाणार आहेत. भाजपाच्या आय टी सेल कडून सातत्याने विरोधी पक्षातील नेतेमंडळींबाबत चुकीची माहिती पसरवण्यात येत असून फेक न्यूज आणि फेक नरेटिव्ह तयार केले जात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्याच संदर्भात झालेल्या आजच्या बैठकीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनानुसार हा प्लॅन तयार करण्यात आला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Maharashtraमहाराष्ट्र