शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoffs Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 13:42 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी १,३८,६२२ मतं मिळवून तिसऱ्यांदा विजय संपादन केला आहे.

दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी १,३८,६२२ मतं मिळवून तिसऱ्यांदा विजय संपादन केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांचा दारुण पराभव केला. चारोस्कर यांना ९४,२१९ मतं मिळाली. यानंतर आता नरहरी झिरवाळ यांनी "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला आहे… आता दुसरं पद दिलं तर बरं होईल" अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

"निकाल चांगला होता. माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी, दादांनी, मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केलं. त्यांच्या माध्यमातून कामं करण्यात आली. त्यामुळे लोकांनी मला खांद्यावर घेतल्यासारखं वाटलं.  मला वाटतं सभागृहाचं मी आता सर्व अनुभवलं आहे... दुसरीकडे कुठेतरी पद दिलं तर बरं होईल. तिकडचाही अनुभव येईल. तर बघा कसं होतंय... आपल्यावतीने नेते मंडळींना विनंती करा" असं माध्यमांना प्रतिक्रिया देताना नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे. 

यावेळी मतदारसंघात विक्रमी ७५ टक्के अशी मतदानाची नोंद झाली. त्यात महिलांचाही टक्का वाढला होता. वाढलेला मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, यांची तालुकाभरात चर्चा होती. मतदारसंघातून १३ उमेदवार उभे राहिलेले होते. परंतु खरी लढत ही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे झिरवाळ व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्य चारोस्कर यांच्यात झाली. यात पहिल्या फेरीपासून झिरवाळ यांनी घेतलेली आघाडी ही शेवटपर्यंत टिकवून ठेवली. अखेर झिरवाळ ४४,४०३ इतक्या मताधिक्याने विजयी झाले. 

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असूनही झिरवाळ विजयी झाले होते. मतदारसंघात वर्चस्व प्रस्थापित केल्यामुळे २०१९ मध्येदेखील शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा त्यांना संधी दिली होती. त्यांना १ लाख २४ हजार ५२० मते मिळाली होती. त्यांनी शिवसेनेचे भास्कर गावित यांचा पराभव केला होता.
 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narhari Jhariwalनरहरी झिरवाळdindori-acदिंडोरी