IPL Playoffs Scenarios After KKR Stun GT Updated Points Table : IPL २०२६ स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. पण प्लेऑफ्सचं चित्र मात्र अधिकच गुंतागुंतीचं होताना दिसत आहे. १६ गुणांसह आघाडीच्या दोनमध्ये असलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना जिंकून प्लेऑफ्सचं तिकीट निश्चित करण्याची संधी होती. पण स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झगडणाऱ्या KKR नं त्यांचा विजय रथ रोखत “टायगर अभी जिंदा है..." असा ट्रेलरच दाखवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्क्रिप्ट भारी आहे की, खरंच सामने भारी होत आहेत?
त्याआधी स्वबळावर प्लेऑफ्स गाठण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला स्पर्धेबाहेर पडलेल्या लखनौ सुपर जायंट्सनं धक्का दिला. एवढंच नाही तर मुंबई इंडियन्सच्या संघानं पंजाब किंग्सला पराभूत करत स्वतः बाहेर पडून प्लेऑफ्सच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट निर्माण केला. पहिल्या सात सामन्यात एकही पराभव न पदरी पडलेला पंजाब किंग्सच्या संघावरही प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. GT सह गत चॅम्पियन RCB संघही १६ गुण मिळवून वेटिंगवर आहे. SRH आणि RR संघावरही १६ गुणांपर्यंत पोहचून पोटात गोळा आणणारा ट्विस्ट प्लेऑफ्सच्या शर्यतीत पाहायला मिळू शकतो. स्पर्धेतील आव्हान संपलेल्या दोन संघासह DC सारख्या 'जर तर'च्या समीकरणात अडकलेल्या संघांमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहिल्यावर IPL स्पर्धेतील सामन्यांची स्क्रिप्ट भारी आहे की, खरंच सामने भारी होत आहेत? असा प्रश्न पडू लागला आहे.
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
१६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ १२ सामन्यानंतर १६ गुणांची कमाई करून नेट रनरेटच्या जोरावर १३ सामन्यानंतर १६ गुण कमावणाऱ्या गुजरात टायटन्सपेक्षा एक पाऊल पुढे आहे. उर्वरित दोन सामन्यात ते पंजाब किंग्स आणि हैदराबाद विरुद्ध खेळणार आहेत.
RCB समोर असे आहे समीकरण
जर पंजाबविरुद्ध त्यांनी विजय नोंदवला तर RCB च्या रुपात प्लेऑफ्समधील पहिला संघ मिळेल, पण जर हा सामना त्यांनी गमावला तर १६ गुणांसह तेही GT प्रमाणे वेटिंगवर राहतील. SRH विरुद्धचा सामना जिंकून त्यांना १८ गुणांसह आघाडीच्या टॉपमध्ये कायम राहण्याची संधी असेल. पण समजा हा सामनाही गमावला तर नेट रनरेटचा जोरावर ते कितव्या स्थानावर राहणार ते ठरेल.
GT चा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर, पण....
गुजरात टायटन्सचा संघ १३ सामन्यानंतर १६ गुणासह दुसऱ्या स्थानी आहे. ते साखळी फेरीतील आपला अखेरचा सामना १६ गुणांसह प्लेऑफ्सची दावेदारी ठोकणाऱ्या CSK विरुद्ध खेळणार आहेत. जर या सामन्यात गुजरातच्या पदरी पराभव पडला तर १६ गुणांसह ते वेटिंगवर राहतील. याउलट सामना जिंकला तर अव्वल दोनमध्ये टिकून क्वॉलफायर १ खेळण्याचा फायदा घेण्याचा त्यांचा मार्ग खुला होईल.
SRH चा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, जर...
सनरायझर्सच्या संघाने १२ सामन्यानंतर १४ गुणांची कमाई केली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्याविरुद्धच्या लढती जिंकून त्यांना १८ गुणांसह आघाडीच्या दोनमधील आपली दावेदारी पक्की करता येईल. एक विजय आणि एक पराभव त्यांना १६ गुणांवर थांबवू शकतो. तर दोन्ही सामने गमावले तर ते प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट होऊ शकतात.
पंजाब किंग्ससाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा
पंजाब किंग्सचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध एक तर स्पर्धेबाहेर झालेल्या लखनौ विरुद्ध साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळणार आहे. एक पराभव आणि एक विजय त्यांना जर तरच्या समीकरणात अडकवू शकतो. त्यामुळे प्लेऑफ्सच गणित सोपे करण्यासाठी त्यांना दोन्ही सामने जिंकल्याशिवाय पर्याय नाही. जर त्यांनी हा डाव साधला तर ते प्लेऑफ्सच तिकीट पक्के करतील.
RR चा संघ DC ला आउट करून गुंता बऱ्यापैकी सोडवणार?
राजस्थान रॉयल्सच्या संघाने ११ सामन्यानंतर १२ गुण कमावले असून उर्वरित ३ सामने जिंकून तेही १८ गुणांसह आघाडीच्या २ मध्ये आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी शड्डू ठोकू शकतात. जर त्यांनी रविवारी, १७ मेला दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले तर दिल्ली स्पर्धेतून बाहेर पडणारा तिसरा संघ ठरेल. त्यानंतर त्यांच्यासमोर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जाएंट्सचे आव्हान असेल. जर याआधीप्रमाणे या दोन संघांनी RR ला धक्का दिला तर अव्वल २ मध्ये पोहोचण्याचा मार्ग बंद होऊन स्पर्धेबाहेर पडण्याची वेळ त्यांच्यावरही येऊ शकते.
तरच DC आणि KKR ला संधी
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला सर्वात आधी आपले उर्वरित सामने जिंकावे लागतील. त्यानंतर चौथ्या स्थानासह प्लेऑफ्स गाठण्यासाठी इतर संघाच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
Web Summary : IPL 2026 playoff race intensifies! Unexpected upsets create a complex scenario. Sixteen-point teams face uncertainty. Every match counts as teams vie for a coveted playoff spot. Even top contenders face elimination risks.
Web Summary : IPL 2026 प्लेऑफ की दौड़ तेज! अप्रत्याशित उलटफेर से जटिल परिदृश्य। सोलह अंकों वाली टीमें अनिश्चितता का सामना कर रही हैं। हर मैच मायने रखता है क्योंकि टीमें प्लेऑफ स्थान के लिए प्रतिस्पर्धा करती हैं। शीर्ष दावेदारों को भी खतरा!