शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 13:35 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : येथे देवेंद्र फडणवीस यांनी सहाव्यांदा विजयश्री खेचून आलणली आहे. यातच, आता महायुतीतील नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदासंदर्भातही प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. यामुळे राज्याला पुढचा नवा मुख्यमंत्री कोण मिळतो हे बघणे महत्वाचे ठरेल...

राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहे. आतापर्यंत आलेल्या निकालात संपूर्ण राज्यातच महायुतीला मोठे यश मिळताना दिसत आहे. तर महाविकास आघाडीचा पार सुपडा साफ होताना दिसत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला संपूर्ण राज्यात मोठा फटका बसला होता. मात्र आता, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती ती कसर भरून काढताना दिसत आहे. यातच, राज्यासह संपूर्ण देशाची नजर असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी आली आहे. येथे देवेंद्र फडणवीस यांनी सहाव्यांदा विजयश्री खेचून आलणली आहे. यातच, आता महायुतीतील नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदासंदर्भातही प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. यामुळे राज्याला पुढचा नवा मुख्यमंत्री कोण मिळतो हे बघणे महत्वाचे ठरेल.

नागपूर दक्षिम-पश्चिम विधानसभा मतदारसंघात विरोधकांना भाजपचा अश्वमेध यावेळीही रोखता आला नाही. येथे, भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहाव्यादा निवडनुकीच्या मैदानात होते. त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांचा मोठा पराभव केला आहे. महत्वाचे म्हणजे, निकाल यायला सुरुवात झाल्यापासून फडणवीस आघाडीवर होते. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, ते आज आपल्या नागपूर येथील निवासस्थानी जाणार असल्याचे समजते.

फडणवीसच मुख्यमंत्री होतील -दरम्यान, देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. "आता मुख्यमंत्री हा महायुतीचाच बनणार आहे. जो पक्ष मोठा आहे, त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी देण्यात येते. भारतीय जनता पक्ष सवाशेच्या आसपास पोहोचणार असून भाजप मोठा पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचा बनणार आहे. यामध्ये महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. 

बघा लाइव्ह ब्लॉग : Watch Live Blog >>

आम्हाला विजयाची खात्री होती -याचबरोबर, देवेंद्र फडणवीस यांनी जे धर्मयुद्ध पुकारले होते,  त्यासाठी हम सब एक है चा नारा जनतेने मान्य केला. केंद्रात भाजपचे सरकार, महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यास राज्याचा विकास होईल, यामुळे अधिक मतदान झाले. आम्हाला विजयाची खात्री होती. महाराष्ट्राची जनता इतका आशीर्वाद देईल, असे वाटले नव्हते. लाडक्या बहिणींना सलाम करतो, त्यांच्यापुढे नतमस्तक होतो, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरBJPभाजपाMahayutiमहायुतीcongressकाँग्रेस