Vidhan Sabha 2019: पक्षांतरामुळे कॉँग्रेस खस्ता; ‘युती’त बळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 03:23 AM2019-09-22T03:23:50+5:302019-09-22T03:24:37+5:30

युती मजबूत; पण बंडखोरीची धास्ती

Maharashtra Vidhan Sabha 2019 Partisan congressional crises; Strength in the 'Alliance' | Vidhan Sabha 2019: पक्षांतरामुळे कॉँग्रेस खस्ता; ‘युती’त बळ

Vidhan Sabha 2019: पक्षांतरामुळे कॉँग्रेस खस्ता; ‘युती’त बळ

Next

- किरण अग्रवाल 

नाशिक : गेल्या निवडणूकीत भाजपाशिवसेना ‘युती’ ने प्राबल्य राखलेल्या उत्तर महाराष्ट्रात नगर व धुळे नंदुरबारसह नाशिकमध्ये बऱ्यापैकी अस्तित्व टिकवून ठेवलेल्या कॉँग्रेस- राष्ट्रवादीला यंदा पक्षांतराचे ग्रहण लागल्याने कॉँग्रेसची हालत खस्ता तर युतीला बळ लाभून गेलेले दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला होता. त्या पाठोपाठ आगामी विधानसभेच्या दृष्टीने नंदुरबारमध्ये गेल्या सुमारे ५० वर्षांपासून कॉँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनीही भाजपचे कमळ हाती धरले आहे, तर पुत्री निर्मला गावित यांनी कॉँग्रेस आमदारकीचा राजीनामा देत शिवबंधन हाती बांधले आहे. नगर जिल्ह्यातील कॉँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत तर राष्टÑवादीचे वैभव पिचड भाजपात प्रवेशकर्ते झाले आहेत. त्यामुळे संख्याबळात प्रत्येकी सहा जागा मिळवून गेल्यावेळी नगर जिल्ह्यात समसमान राहीलेल्या युती व आघाडीच्या बळात यंदा फरक पडला आहे. कॉँग्रेस- राष्टÑवादीची स्थिती काहीशी कमजोर झाली असून, भाजपा शिवसेना मजबूत स्थितीत आली आहे. नंदुरबार जिल्हा आजवर कॉँग्रेससाठी अनुकूल राहत आला आहे. परंतु तेथेही या पक्षात पडझड झाली आहे. शिवाय लगतच्या शहादा मधील मातब्बर नेते पी. के. अण्णा पाटील यांचे पुत्र दीपक पाटील हे देखील भाजपात गेले आहेत. त्यामुळे या आदिवासी पट्ट्यात भाजप मजबूत बनली आहे. खान्देशात जळगावमध्ये ११ पैकी सहा जागा जिंकलेल्या भाजपची स्थिती सर्वात चांगली असली तरी, लोकसभा निवडणुकीवेळी तिकीटावरून पदाधिकाऱ्यांत जाहीरपणे झालेली मारहाण पहाता यंदा विधानसभेला त्याचे काय पडसाद उमटतात ते पहाणे औत्सुक्याचे ठरले आहे. नाशकातही शहरातील तीनही जागा भाजप राखून असला तरी यंदा उमेदवारी बदलली जाण्याचे संकेत आहेत. एकूण उत्तर महाराष्टÑात युती सध्यातरी मजबूत असली तरी ऐनवेळी होणारी बंडखोरी चित्र बदलू शकते.

प्रचारात मुद्दे काय?
नंदुरबार, नाशिक व नगर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात वन हक्क दाव्यांचा प्रश्न लोंबकळला आहे. त्यामुळे या परीसरात सदरचा मुद्दा प्रचारात प्रभावी ठरेल.
गिरीश महाजन, जयकुमार रावल, दादा भुसे व राम शिंदे यांच्यासारखे मंत्री असताना उत्तर महाराष्टÑात नवा उद्योग किंवा मोठ्या प्रमाणात रोजगार देऊ शकणारा प्रकल्प येऊ शकलेला नाही.
नाशिकच्या कांद्यापासून जळगावच्या केळी पर्यंत सर्व शेतमालाच्या भावाचा प्रश्न कायम आहे. शेतकºयांच्या आत्महत्या कमी झालेल्या नसून कर्जमाफी फोल ठरल्याची भावना आहे.

उत्तर महाराष्ट्रातील सध्याचे बलाबल
एकूण जागा- ४७
भाजप-१९
शिवसेना-८
काँग्रेस-११
राष्ट्रवादी-७
इतर-२

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Partisan congressional crises; Strength in the 'Alliance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.