शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

Vidhan Sabha 2019: निवडणूक जाहीर; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 3:39 AM

विरोधक: बेरोजगारीवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार; सत्ताधारी: पंधरा वर्षांत झाले नाही, ते करून दाखवले

विकासाच्या मुद्द्यांवर सत्ताधारी मागणार जनतेचा कौल-यदु जोशीमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची कसोटी या निवडणुकीच्या निमित्ताने लागणार आहे. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशाच्या सावलीत होत असलेली ही निवडणूक अ‍ॅडव्हान्टेज युती अशी असेल.निवडणुकीसाठी आवश्यक असलेली सर्वच प्रकारची कुमक लक्षात घेता भाजप-शिवसेना युती ही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपेक्षा कितीतरी पुढे असल्याचे दिसते.जमेची बाजूदेवेंद्र फडणवीस यांच्यासारखे आश्वासक नेतृत्व. त्यास भाजप पक्षसंघटनेची जोरदार साथभाजप-शिवसेनेची एकत्रित ताकद. देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमध्ये अत्यंत चांगला समन्वय.शेतकरी कर्जमाफीसोबतच पायाभूत सुविधा प्रकल्प, मेट्रो, समृद्धी महामार्ग यासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे विकासाभिमुख प्रतिमामराठा समाजास दिलेले आरक्षण, या समाजासाठी सारथी संस्थेची स्थापना, ओबीसी कल्याणाचे निर्णय, डीबीटीद्वारे लाभार्र्थींच्या खात्यात थेट रक्कम.जलयुक्त शिवारचे यश, पंतप्रधान आवास योजनेत हजारोंना घरे, मुख्यमंत्री ग्रामसडकमधील कामे.बसणार फटकाफडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांवर झालेले घोटाळ्यांचे आरोप. इतर पक्षांमधून केलेल्या मेगाभरतीमुळे भाजप-शिवसेनेच्या केडरमधील कार्यकर्त्यांची नाराजीनेते कितीही एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर भाजप-शिवसेनेत अनेक ठिकाणी असलेला समन्वयाचा अभाव. युती झाल्याने काही ठिकाणी बंडखोरीची भीती.उमेदवार बदलले नाही तर काही मतदारसंघात अ‍ॅण्टी इन्कंबन्सीचा फटका बसू शकतो. विशेषत: ज्यांनी तीन टर्म पूर्ण केलेल्या आहेत.कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकरी, बेरोजगारी हे मुद्दे सरकारच्या विरोधात जाणारे आहेत. यादीत नाव असताना काहींना फायदा मिळाला नाही.सरकारच्या आभासी विकासावर हल्ला चढवणार विरोधक- अतुल कुलकर्णी मुंबई : आपला विरोधीपक्ष नेता भाजपच्या जवळ जात आहे हे लक्षात येऊनही पक्षनेत्यांनी वेळीच लक्ष दिले नाही. राष्टÑवादीने नगरच्या जागेसाठी नको तेवढा हट्ट धरला व विखे पाटील भाजपमध्ये गेले. परिणामी] दोन्ही काँग्रेसला गळती लागली. ती अजूनही थांबत नाही. पक्ष वाढवावा अशी इच्छाशक्ती दोघांकडेही उरली नाही. आपत्तीला इष्टापत्तीत बदलण्याची धमक असणारे नेते ‘शेल’मध्ये गेले. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे.जमेची बाजूवंचित आणि एमआयएम भाजपची टीम असल्याचे स्पष्ट झाल्याने दलित मुस्लिम मतदार काँग्रेसकडे येईल.अनेकजण पक्ष सोडून गेल्याने काँग्रेस, राष्टÑवादीला जिल्ह्याजिल्ह्यात तरुणांची नवी फळी उभी करण्याची मोठी संधी.आर्थिक मंदी, बेरोजगारी, वाढती महागाई, महिलांच्या अत्याचारात वाढ, नुसतीच आश्वासने; असे अनेक विषय विरोधकांकडे आहेत.शरद पवार यांनी राज्यभरात तरुणांना घातलेली साद, काँग्रेसचा पारंपारिक मतदार, भरमसाठ इनकमिंगमुळे भाजपमध्ये तयार झालेली नाराजी फायद्याची ठरेल.खºया अर्थाने धर्मनिरपेक्षता दाखवण्यात यश आले तर एक मोठा वर्ग दोन्ही काँग्रेसकडे वळू शकतो.बसणार फटकानात्यागोत्याचेच राजकारण करण्याची वृत्ती दोन्ही पक्षांना अडचणीत आणण्याचे कारण ठरणारसाम, दाम, दंड, भेद आणि पैसा वापरण्याची क्षमता असली तरी ते वापरण्याची इच्छाशक्ती काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तसूभरही दिसत नाही.राष्टÑवादीची सगळी मदार एकट्या शरद पवार यांच्यावर. अन्य नेत्यांमधे धनंजय मुंडे वगळता एकही नेता आक्रमकपणे समोर येत नाही.तरुणांना दोन्ही काँग्रेसमध्ये भवितव्य आहे असे वाटत नाही, तो विश्वास तयार करण्यात नेत्यांना सपशेल अपयश आल्याचा मोठा फटका यावेळी बसू शकतो.दोन्ही पक्षांनी कार्यकर्ते आणि केडर तयार करण्याकडे गेल्या पाच वर्षात केलेले अक्षम्य दुर्लक्ष.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस