शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024: विधान परिषद निवडणुकीत महायुतीची बाजी! काँग्रेसची ७ मते फुटली? कुणाला मिळाली? पाहा मतांचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 21:34 IST

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Nikal 2024 Live Updates: महायुतीचे सर्वच्या सर्व ९ जण विजयी, मविआतील शेकापचे जयंत पाटील पराभूत

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024: विधान परिषदेच्या निवडणुकीत ( Maharashtra MLC Election Result 2024 ) महायुतीने मतांचे गणित जुळवून आणत बाजी मारली. विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. महायुतीने ९ तर महाविकास आघाडीने ३ उमेदवार दिले होते. गुप्त पद्धतीने मतदान झाले आणि निकाल लागला. यात भाजपाचे पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके आणि पुरस्कृत सदाभाऊ खोत तर महायुतीतील शिवसेनेच्या भावना गवळी व कृपाल तुमाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर असे सर्व ९ उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत शेकाप नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला.

विधान परिषदेच्या ११ विजयी उमेदवारांना किती मते मिळाली?

  1. योगेश टिळेकर (भाजपा) - २६
  2. पंकजा मुंडे (भाजपा) - २६
  3. परिणय फुके (भाजपा) - २६
  4. अमित गोरखे (भाजपा)- २६
  5. सदाभाऊ खोत (भाजपा)- २६
  6. भावना गवळी (शिंदे गट)- २४
  7. कृपाल तुमाने (शिंदे गट)- २५
  8. राजेश विटेकर (दादा गट)- २३
  9. शिवाजीराव गर्जे (दादा गट)- २४
  10. प्रज्ञा सातव (काँग्रेस)- २५
  11. मिलिंद नार्वेकर (ठाकरे गट)- २४

पराभूत उमेदवार

जयंत पाटील (शेकाप- शरद पवार गट पुरस्कृत)- १२

काँग्रेसची फुटलेली ७ मते कुठे गेली?

  1. काँग्रेसची ७ मते फुटल्याचा संशय सध्या तरी बांधला जातोय. काँग्रेसकडे एकूण ३७ मते होती. काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची २५ मते मिळाली.
  2. सातवांना २५ मते दिल्यानंतर काँग्रेसकडे १२ मते शिल्लक राहिली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे १७ मते होती, त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांना काँग्रेसच्या ६ मतांची गरज होती.
  3. नार्वेकरांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे १७ आणि काँग्रेसची ५ अशी पहिल्या पसंतीची फक्त २२ मते मिळाली. म्हणजेच काँग्रेसची १२ पैकी ७ मते फुटली.
  4. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४२ मते होती पण त्यांच्या दोनही उमेदवारांना मिळून ५ मते जास्त मिळाली. म्हणजेच काँग्रेसच्या ७ पैकी ५ मते अजितदादांच्या राष्ट्रवादीने फोडली असा अंदाज आहे.
  5. भाजपाकडे ११५ मते होती आणि भाजपाच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची एकूण ११८ मते मिळाली.
  6. भाजपाला एकूण ३ मते जास्त मिळाली. त्यापैकी एक मत हे मनसेचे असू शकते. याचाच अर्थ उर्वरित दोन अधिकची मते ही भाजपाला काँग्रेसकडून मिळाल्याचा अंदाज आहे.
  7. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यासह पहिल्या पसंतीची ४६ मते होती. शिंदेंच्या शिवसेनेला ४९ मते मिळाली. म्हणजेच त्यांनाही समाजवादी पार्टी आणि MIM ची मते मिळाल्याची शक्यता आहे.
टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Vidhan Parishadविधान परिषदEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना