शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’ची महाराष्ट्र प्रदेश शाखा विसर्जित

By admin | Updated: October 2, 2015 03:53 IST

चानक घडलेल्या राजकीय घडामोडीत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पक्षाची महाराष्ट्र प्रदेश शाखा विसर्जित केली.

हरीश गुप्ता,नवी दिल्लीअचानक घडलेल्या राजकीय घडामोडीत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पक्षाची महाराष्ट्र प्रदेश शाखा विसर्जित केली. ‘आप’ने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लढवायच्या नाही, असा निर्णय घेतल्यापासूनच पक्षाची प्रदेश शाखा तशी निष्क्रियच बनलेली होती. परंतु केंद्रीय नेतृत्वाने स्वत:ला राज्यातील कार्यवाहीपासून स्वत:ला वेगळे न ठेवल्याने प्रदेश शाखा कागदावर अस्तित्वात होती. प्रदेश शाखेचे नेतृत्व करणारे आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेले मयंक गांधी यांनी केजरीवाल यांच्या या निर्णयावर सडकून टीका केली. राष्ट्रीय कार्यकारिणीतील बहुतांश सक्रिय सदस्यांनी याआधीच पक्ष सोडलेला आहे. तथापि, पक्षाच्या राजकीय कामकाज कमिटीने महाराष्ट्र प्रदेश शाखा विसर्जित करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा ‘आप’ने एका निवेदनात केला आहे.त्यावर मयंक गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘राजकारणाचे दोन प्रकार. एक प्रत्यक्ष लोकांसमवेत काम करणारे आणि दुसरे दिल्लीत ‘चापलुसी’ करणारे. या दुसऱ्या प्रकारचे राजकारण विजयी झाले आहे. जय हो,’असे टिष्ट्वट करून गांधी यांनी आपला रोष व्यक्त केला. दरम्यान, हा प्रदेश शाखांची पुनर्रचना करण्याचा एक भाग असल्याचे दिल्लीतील ‘आप’ नेते खासगीत बोलत आहेत. महाराष्ट्र प्रदेश शाखेला पक्षश्रेष्ठींच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. याआधी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना बडतर्फ करण्यात आले. तेव्हापासून पक्षाच्या अन्य प्रदेश शाखांमध्ये बंडखोरी धुमसत होती. तथापि, कोणत्याही नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती न करता संपूर्ण प्रदेश शाखा विसर्जित केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. मयंक गांधी हे केजरीवाल यांच्यासाठी डोकेदुखी ठरले होते, अशी माहिती आहे.‘विविध राज्यांमधील पक्ष संघटना बळकट करण्याच्या चालू प्रक्रियेंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाखा विसर्जित करण्याचा निर्णय राजकीय कामकाज कमिटीने (पीएसी) घेतला आहे. राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता हे महाराष्ट्र प्रदेश शाखेचे प्रमुख असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चमू राज्यात संघटनबांधणीचे काम करेल. ही नवी संरचना लवकरच आकार घेईल. या चमूला संघटनबांधणीत सहकार्य करावे, अशी पक्षाच्या सर्व सदस्यांना विनंती करण्यात येत आहे,’असे ‘आप’च्या या निवेदनात म्हटले आहे.