Coronavirus: दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०८ टक्के; गेल्या २४ तासांत ८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 20:43 IST2021-09-07T20:41:46+5:302021-09-07T20:43:40+5:30

Coronavirus: राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे.

maharashtra reports 3898 new corona cases and 86 deaths in last 24 hours | Coronavirus: दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०८ टक्के; गेल्या २४ तासांत ८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

Coronavirus: दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०८ टक्के; गेल्या २४ तासांत ८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत राज्यात एकूण ३ हजार ८९८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंदगेल्या २४ तासांत ३ हजार ५८१ रुग्ण कोरोनामुक्तयाच कालावधीत ८६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३ हजार ५८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.०८ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ३ हजार ८९८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 3898 new corona cases and 86 deaths in last 24 hours)

राष्ट्रवादीचा आरोप म्हणजे ‘आधी चोऱ्या, आता बहाणे’ असा प्रकार; भाजपचा पलटवार

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ८९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ८६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३ हजार ५८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ०४ हजार ३३६ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ४७ हजार ९२६ इतकी आहे. 

मुंबईकरांच्या चिंतेतही काहीशी भर 

गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ३५३ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ४०४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत २ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १६ हजार इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ३ हजार ७१८ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०६ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी १२६६ दिवसांवर गेला आहे. 

दरम्यान, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५१ लाख ५९ हजार ३६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ९३ हजार ६९८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात ३ लाख ०६ हजार ५२४ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार ०२१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 
 

Web Title: maharashtra reports 3898 new corona cases and 86 deaths in last 24 hours