राष्ट्रवादीचा आरोप म्हणजे ‘आधी चोऱ्या, आता बहाणे’ असा प्रकार; भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 06:56 PM2021-09-07T18:56:37+5:302021-09-07T18:59:16+5:30

राष्ट्रवादीकडून करण्यात आलेला आरोप म्हणजे ‘आधी चोऱ्या, आता बहाणे’, असा प्रकार असल्याचा पलटवार भाजपने केला आहे.

bjp pravin darekar replied nawab malik over devendra fadnavis criticism | राष्ट्रवादीचा आरोप म्हणजे ‘आधी चोऱ्या, आता बहाणे’ असा प्रकार; भाजपचा पलटवार

राष्ट्रवादीचा आरोप म्हणजे ‘आधी चोऱ्या, आता बहाणे’ असा प्रकार; भाजपचा पलटवार

googlenewsNext

मुंबई: गेल्या काही कालावधीपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आरोपाची भर पडली असून, भाजपकडून याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादीकडून करण्यात आलेला आरोप म्हणजे ‘आधी चोऱ्या, आता बहाणे’, असा प्रकार असल्याचा पलटवार भाजपने केला आहे. (bjp pravin darekar replied nawab malik over devendra fadnavis criticism)

दिल्ली व मुंबईत आयपीएस अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी बैठका घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

“शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय, विरोधी पक्ष वापर करून घेतोय”; भाजपची टीका

राज्य सरकार अपयशी ठरले की केंद्रावर आरोप करायचे

राज्य सरकार अपयशी ठरले की केंद्रावर आरोप करायचे, कोरोना वाढला की सामान्य जनतेवर आरोप करायचे, हेच सुरू आहे. आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत. रोज सकाळी मीडियाला अजेंडा ठरवून देऊन सरकार चालत नसते, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. आरोप झाले की कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार, अशी विधाने करायची आणि नोटीस आली की बिळात लपून बसायचे. तुम्ही काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता, तुमचे सहकारी दोन-तीन महिन्यांपासून का फरार आहेत, अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

मंदिराच्या मालमत्तेचा मालक कोण, परमेश्वर की पुजारी? सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वाचा निकाल

भाजपचा विजय म्हणजे मराठी माणसाचा पराभव असल्याचा अपप्रचार

बेळगावमधील भाजपचा विजय म्हणजे जणू मराठी माणसाचा पराभव आहे, असा अपप्रचार काही नेते करत आहेत. पण, भाजपच्या विजयी ३६ नगरसेवकांमध्ये २३ मराठी आहेत, हे सांगितले जात नाही. निव्वळ भावनात्मक विषय करून सामान्य जनतेची फसवणूक करता येत नाही. निवडणूक निकालावर शंका उपस्थित करून शिवसेना आता काँग्रेसच्या अधिक जवळ गेली आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करणारी पूर्वी एकमेव गलितगात्र काँग्रेस होती. शिवसेनेलाही त्याच रांगेत जाऊन बसण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत, असा टोला प्रवीण दरेकरांनी लगावला. 
 

Web Title: bjp pravin darekar replied nawab malik over devendra fadnavis criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.