CoronaVirus: राज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले; पण, ‘या’ भागांत एकही मृत्यू नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 09:29 PM2021-05-26T21:29:10+5:302021-05-26T21:32:18+5:30

CoronaVirus: गेल्या दोन दिवसांपेक्षा राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे.

maharashtra reports 24 752 new corona cases and 453 deaths in last 24 hours | CoronaVirus: राज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले; पण, ‘या’ भागांत एकही मृत्यू नाही 

CoronaVirus: राज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले; पण, ‘या’ भागांत एकही मृत्यू नाही 

Next
ठळक मुद्देराज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले‘या’ भागांत एकही मृत्यू नाही मुंबईकरांच्या चिंतेतही किंचित भर

मुंबई: राज्यातील जनतेसाठी चिंतेत किंचित भर घालणारे वृत्त आहे. गेल्या दोन दिवसांपेक्षा राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. तसेच कोरोना मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत २३ हजार ०६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२.७६ टक्क्यांवर गेला आहे. तसेच गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण २४ हजार ७५२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 24 752 new corona cases and 453 deaths in last 24 hours) 

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत २४ हजार ७५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ४५३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच २३ हजार ०६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५२ लाख ४१ हजार ८३३ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.६२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण ३ लाख १५ हजार ०४२ आहे.

लस खरेदीची पंचवार्षिक योजना राबवणार आहात का; गुजरात हायकोर्टाने सरकारला सुनावले

मुंबईकरांच्या चिंतेतही किंचित भर

गेल्या सलग ७ दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३६२ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत १ हजार ०२१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ३४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १४ हजार ७४२ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २७ हजार ९४३ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.१९ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ३४८ दिवसांवर गेला आहे. 

‘या’ भागांत एकही मृत्यू नाही 

गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा, धुळे जिल्हा, लातूर शहर, परभणी शहर, उल्हासनगर शहर, भिवंडी शहर, मीरा भायंदर शहर, कल्याण डोंबिवली शहर, ठाणे शहर, औरंगाबाद शहर, जळगाव शहर, धुळे शहर या ठिकाणी कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही. तर नवी मुंबई, वसई विरार, मालेगाव, अमरावती शहर परिसरात आणि औरंगाबाद, पालघर, चंद्रपूर जिल्ह्यात एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. 

‘कोरोनिल’ला विरोध करणाऱ्यांनी पतंजलीमध्ये यावे, आम्ही प्रमाण देऊ: आचार्य बालकृष्ण

दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ३८ लाख २४ हजार ९५९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५६ लाख ५० हजार ९०७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात २३ लाख ७० हजार ३२६ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, १९ हजार ९४३ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 
 

Web Title: maharashtra reports 24 752 new corona cases and 453 deaths in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.