Maharashtra Politics :'तटकरे, पटेलांनी विनंती केली म्हणून आलो'; छगन भुजबळांनी अजित पवारांचा उल्लेख टाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 12:15 IST2025-01-18T12:14:50+5:302025-01-18T12:15:18+5:30

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजपासून दोन दिवस अधिवेशन होत आहे.

Maharashtra Politics I came because sunil Tatkare, Praful Patel requested me Chhagan Bhujbal avoids mentioning Ajit Pawar | Maharashtra Politics :'तटकरे, पटेलांनी विनंती केली म्हणून आलो'; छगन भुजबळांनी अजित पवारांचा उल्लेख टाळला

Maharashtra Politics :'तटकरे, पटेलांनी विनंती केली म्हणून आलो'; छगन भुजबळांनी अजित पवारांचा उल्लेख टाळला

Maharashtra Politics ( Marathi News ) : विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्यांदाच शिर्डीत अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात नाराज असलेले माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार का? या चर्चा सुरू होत्या, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी काल भुजबळ आणि मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती. दरम्यान, आजच्या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विनंती केली म्हणून आलो असं सांगितले, अजित पवार यांचा त्यांनी उल्लेख करणे टाळला. 

NCP: मोठी बातमी! धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला जाणार नाहीत; कारणही सांगितलं

माजी मंत्री आमदार छगन भुजबळ शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. छगन भुजबळ म्हणाले,  खासदार प्रफुल्ल पटेल काल येऊन बसले होते. सुनील तटकरे यांनीही अधिवेशनाला या म्हणून विनंती केली होती, त्यामुळे मी अधिवेशनाला आलो. अधिवेशनात पूर्ण वेळ थांबणार नाही, थोडावेळ थांबून जाणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. 

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करणे टाळला. यामुळे भुजबळ अजूनही पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. आज शिर्डीत होणाऱ्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत, यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला जाणार नाहीत

आजपासून शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवस अधिवेशन होणार आहे. याबाबत काल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माहिती दिली होती. या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मंत्री धनंजय मुंडे अधिवेशनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. 

मंत्री धनंजय मुंडे यांच्या ऑफिसकडून याबाबत माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. या अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह बडे नेते उपस्थित राहणार आहे. १८, १९ जानेवारी असं दोन दिवस पक्षाचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी पक्षाचे ७०० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

Web Title: Maharashtra Politics I came because sunil Tatkare, Praful Patel requested me Chhagan Bhujbal avoids mentioning Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.