शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
2
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
3
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
4
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
5
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
6
३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
7
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
8
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
9
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
10
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
11
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
12
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
13
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
14
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
15
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
16
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
17
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
18
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
19
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
20
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
Daily Top 2Weekly Top 5

कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 09:21 IST

Maharashtra Municipal Election 2026: महाराष्ट्रात निवडणुकीचा धुराळा! २९ महापालिकांसाठी 'दोस्ती आणि कुस्ती'चे चित्र स्पष्ट; वाचा कोणत्या शहरात कोणाची युती?

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असून, राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी राजकीय पक्षांनी आपल्या आघाड्या आणि युतीची गणिते पक्की केली आहेत. काही शहरांमध्ये पारंपरिक शत्रू गळ्यात गळे घालून फिरताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी मित्रपक्षांनीच एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकले आहेत. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी राज्याचे राजकीय चित्र अत्यंत रंजक बनले आहे.

ठाकरे बंधूंची ऐतिहासिक युती: यावेळच्या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई, ठाणे आणि नाशिकसह अनेक शहरांत उद्धव ठाकरे (शिवसेना UBT) आणि राज ठाकरे (मनसे) यांनी हातमिळवणी केली आहे. मुंबई महापालिकेत तब्बल २५ वर्षांनंतर हे दोन्ही बंधू एकत्र आल्याने सत्ताधारी महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

राष्ट्रवादीचे दोन प्रवाह; कुठे एकत्र तर कुठे स्वतंत्रपुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, इतर अनेक शहरांत हे दोन्ही गट एकमेकांविरुद्ध स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडीत 'बिघाडी'सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेसेना बहुतांश ठिकाणी एकत्र आहेत, परंतु नाशिक आणि सोलापूरसारख्या शहरात स्थानिक वादांमुळे त्यांनी स्वतंत्रपणे किंवा वेगवेगळ्या मित्रांसोबत जाणे पसंत केले आहे. काँग्रेसनेही अनेक ठिकाणी 'वंचित'सोबत मैत्री करत आपली ताकद आजमावण्याचे ठरवले आहे. 

अ.क्र.महानगरपालिकायुती / आघाडी (कोणासोबत मैत्री?)स्वतंत्र लढणारे पक्ष (कुस्ती)
मुंबई

१. भाजप+शिंदेसेना+रिपाई (आठवले)

 

२. उद्धवसेना+मनसे+राष्ट्रवादी (श.प.)

 

३. काँग्रेस+वंचित

राष्ट्रवादी (अजित पवार)
ठाणे

१. भाजप+शिंदेसेना युती

 

२. उद्धवसेना+मनसे+राष्ट्रवादी (श.प.)

राष्ट्रवादी (अ.प.), काँग्रेस, वंचित
पुणे

१. भाजप+रिपाई (आठवले)

 

२. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र (अजित + शरद पवार)

 

३. काँग्रेस+उद्धवसेना+मनसे

शिंदेसेना, वंचित
नागपूर१. भाजप+शिंदेसेना युतीकाँग्रेस, उद्धवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, बसप, वंचित, मनसे
नाशिक

१. शिंदेसेना+राष्ट्रवादी (अ.प.)

 

२. उद्धवसेना+मनसे+राष्ट्रवादी (श.प.)+काँग्रेस

भाजप, वंचित, माकप, आप, एमआयएम, सपा
नवी मुंबई१. मनसे+उद्धवसेना युतीभाजप, शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस
कल्याण-डोंबिवली

१. भाजप+शिंदेसेना+रिपाई

 

२. उद्धवसेना+मनसे युती

 

३. काँग्रेस+राष्ट्रवादी (श.प.)+वंचित

राष्ट्रवादी (अ.प.), आप
वसई-विरार

१. भाजप+शिंदेसेना युती

 

२. बविआ+मनसे आघाडी

राष्ट्रवादी (अ.प.), काँग्रेस, वंचित
मीरा-भाईंदर१. उद्धवसेना+मनसे युतीभाजप, शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित
१०उल्हासनगर

१. शिंदेसेना+ओमी कलानी+साई पक्ष

 

२. काँग्रेस+उद्धवसेना+मनसे

भाजप, राष्ट्रवादी (अ.प.), वंचित
११भिवंडी

१. भाजप+शिंदेसेना युती

 

२. उद्धवसेना+मनसे आघाडी

राष्ट्रवादी (अ.प.), राष्ट्रवादी (श.प.), काँग्रेस, सपा
१२पनवेल

१. भाजप+शिंदेसेना+राष्ट्रवादी (अ.प.) (महायुती)

 

२. काँग्रेस+उद्धवसेना+राष्ट्रवादी (श.प.)+मनसे+सपा+शेकाप

वंचित
१३पिंपरी-चिंचवड

१. भाजप+रिपाई (आठवले)

 

२. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र (अजित + शरद पवार)

 

३. उद्धवसेना+मनसे

शिंदेसेना, काँग्रेस, वंचित
१४छत्रपती संभाजीनगर

१. काँग्रेस+वंचित आघाडी

 

२. काही जागी काँग्रेस+राष्ट्रवादी (श.प.)

भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादी (अ.प.)
१५सोलापूर

१. शिंदेसेना+राष्ट्रवादी (अ.प.) युती

 

२. काँग्रेस+राष्ट्रवादी (श.प.)+माकप+उद्धवसेना

भाजप, वंचित, एमआयएम
१६कोल्हापूर

१. भाजप+शिंदेसेना+राष्ट्रवादी (अ.प.)+रिपब्लिकन (कवाडे)

 

२. काँग्रेस+उद्धवसेना

 

३. राष्ट्रवादी (श.प.)+वंचित+आप

जनसुराज्य शक्ती+रिपब्लिकन (आठवले)
१७सांगली-मिरज

१. काँग्रेस+राष्ट्रवादी (श.प.)

 

२. उद्धवसेना+मनसे+राष्ट्र विकास सेना

भाजप, राष्ट्रवादी (अ.प.) (छुपा समझोता), शिंदेसेना, वंचित
१८अहमदनगर

१. राष्ट्रवादी (अ.प.)+भाजप युती

 

२. काँग्रेस+राष्ट्रवादी (श.प.)+उद्धवसेना

शिंदेसेना, एमआयएम, वंचित, मनसे
१९अकोला

१. भाजप+राष्ट्रवादी (अ.प.)

 

२. काँग्रेस+राष्ट्रवादी (श.प.)

 

३. उद्धवसेना+मनसे (काही ठिकाणी काँग्रेससोबत)

शिंदेसेना, वंचित, बसप, एमआयएम, प्रहार, आप
२०अमरावती

१. काँग्रेस+उद्धवसेना (१४ जागा)

 

२. उद्धवसेना+मनसे (२ जागी राष्ट्रवादी अ.प. सोबत मैत्री)

 

३. वंचित+युनायटेड फोरम

भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (श.प.), एमआयएम
२१चंद्रपूर

१. भाजप+शिंदेसेना युती

 

२. उद्धवसेना+वंचित युती

काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, बसप, आप
२२नांदेड

१. काँग्रेस+वंचित आघाडी

 

२. शिंदेसेना+राष्ट्रवादी (अ.प.) (दक्षिणमध्ये १६ जागा)

भाजप, उद्धवसेना, मनसे, दोन्ही राष्ट्रवादी
२३परभणी

१. काँग्रेस+उद्धवसेना आघाडी

 

२. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र (अजित + शरद पवार)

भाजप, शिंदेसेना, वंचित, एमआयएम
२४लातूर१. काँग्रेस+वंचित आघाडीभाजप, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही सेना
२५जळगाव

१. भाजप+शिंदेसेना+राष्ट्रवादी (अ.प.) युती

 

२. उद्धवसेना+राष्ट्रवादी (श.प.) आघाडी

 

३. काँग्रेस+वंचित आघाडी

---
२६धुळे

१. शिंदेसेना+राष्ट्रवादी (अ.प.) युती

 

२. उद्धवसेना+राष्ट्रवादी (श.प.)+काँग्रेस+मनसे

भाजप, एमआयएम, बसप, वंचित, आप
२७मालेगाव१. इस्लाम (LAMP) + सपा आघाडीभाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित, एमआयएम
२८जालना

१. राष्ट्रवादी (अ.प.)+मनसे युती

 

२. महाविकास आघाडी (काँग्रेस+श.प.+उद्धवसेना)

भाजप, शिंदेसेना, वंचित, आप, बसप
२९इचलकरंजी

१. भाजप+शिंदेसेना+राष्ट्रवादी (अ.प.) युती

 

२. काँग्रेस+मनसे+राष्ट्रवादी (श.प.)

 

३. वंचित+आप आघाडी

उद्धवसेना, एमआयएम, बसप
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार