शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

Corona Virus : कोरोनाचा कहर सुरूच; आज राज्यात 44 हजारहून अधिक नवे करोना बाधित; अशी आहे मुंबईची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 20:43 IST

महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधित रुग्ण संख्येतही वाढ झाली आहे...

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात काल 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. तर आज रविवारी 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. मुंबईचा विचार करता, एकट्या मुंबईत 19,474 कोरोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. ही रुग्णसंख्या गेल्या चोवीस तासांतील आहे. याशिवाय मुंबईत 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. (Maharashtra Mumbai Corona Virus Case updates) 

राज्यात 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण -महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यादरम्यान 15 हजार 351 जण ठणठणीत होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यात 202259 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.

राजधानी मुंबईत शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी रुग्ण आढळून आले. मुंबईत शनिवारी 20 हजार 318 नवे कोरोना बाधित आढळून आले होते. तर शुक्रवारी 20 हजार 971 कोरोना संक्रमित रुग्ण समोर आले होते.

मुंबईत जानेवारी महिन्यात आतापर्यंत समोर आलेले रुग्ण असे... -01 जानेवारी- 634702 जानेवारी- 806303 जानेवारी- 808204 जानेवारी- 1086005 जानेवारी- 15166 06 जानेवारी- 2018107  जानेवारी- 20971 08 जानेवारी- 20318 

ओमायक्रॉन संक्रमणाचाही ग्राफ वाढला -महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधित रुग्ण संख्येतही वाढ झाली आहे. अशी आहे जिल्हावार संख्या -- सांगली - 57- मुंबई - 40- पुणे एमसी - 22- नागपूर - 21- पीसीएमसी - 15- ठाणे एमसी - 12- कोल्हापूर - 8 - अमरावती - 6- उस्मानाबाद - 5- बुलढाणा आणि अकोला - 4 - गोंदिया - 3- नंदुरबार, सतारा आणि गडचिरोली प्रत्येकी - 2 - औरंगाबाद, लातूर, जालना आणि मीरा भयंदर प्रत्येकी - 1 

कोरोना वाढला तर धार्मिक स्थळंही होणार बंद -"गर्दी वाढली आणि नियमांचं पालन होताना दिसलं नाही तर मद्यविक्रीचीही दुकानं बंद केली जातील. यासोबत धार्मिक स्थळं देखील बंद करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल", असं राजेश टोपे म्हणाले. राज्यात सध्या ऑक्सिजनची मागणी साडेचारशे मेट्रिक टनच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे सध्यातरी निर्बंध आणखी कठोर करण्याची गरज नसल्याचंही टोपे म्हणाले. परिस्थितीत बदल होईल तसे निर्णय घेण्यात येतील. कारण कोरोना रुग्णसंख्या वाढली तर महामारीला नियंत्रित करणं खूप कठीण होऊन बसेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 

राज्यात नवी नियमावली अशी -- राज्यात सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी आणि रात्री 11 ते सकाळी  संचारबंदी - शाळा महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद- मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद - स्विमिंग पूल पूर्णपणे बंद- लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत- खासगी कार्यालयात 2 डोस घेतलेल्यांनाच परवानगी- 2 डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक सेवेचा लाभ घेता येणार- रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेनं रात्री 10 पर्यंत सुरू - लग्नाला 50 तर अंत्यविधीला 20 जणांनाच परवानगी - नवीन आदेशानुसार, ब्युटी पार्लर आणि जिमला 50 टक्के क्षमतेने परवानगी असणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई