Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 18:06 IST2026-04-06T10:00:51+5:302026-04-06T18:06:35+5:30
बारामती पोटनिवडणुकीसह राज्याचे राजकारण, अशोक खरात प्रकरण, अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धातील धमक्या-इशारे, आयपीएलमधील धावांचा पाऊस यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील सर्व महत्त्वाच्या ...

Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
बारामती पोटनिवडणुकीसह राज्याचे राजकारण, अशोक खरात प्रकरण, अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धातील धमक्या-इशारे, आयपीएलमधील धावांचा पाऊस यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
06 Apr, 26 : 05:30 PM
काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आपला उमेदवार उतरवला आहे. आकाश मोरे हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत असून, त्यावर शरद पवारांनी पहिल्यांदाच भाष्य केले.
'काँग्रेसने बारामती विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणे चुकीचे नाही. निवडणूक बिनविरोध करण्याचे काही कारण नाही. समोर कुणीतरी असेल हे मान्य करून निवडणुकीत उतरायला हवे. कुटुंबप्रमुख म्हणून या निवडणुकीची माझ्यावर जबाबदारी आहे', अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.
06 Apr, 26 : 05:17 PM
आम्ही कुणाला फोन करणार नाही, पण...; पार्थ पवारांचा काँग्रेसला टोला
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस नेत्यांना फोन करणार नाही. त्यांना काय करतोय हे कळायला पाहिजे. नंतरच्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसला काय त्रास होणार हे त्यांना दिसेल. लोक विसरत नाहीत. अजितदादांवर जे प्रेम लोकांच्या मनात आहे अशावेळी इतक्या प्रगल्भ पक्षाने असा निर्णय घेणे चुकीचे आहे. आपण कुणाला थांबवू शकत नाही. जसा वेळ येतो, तसं समोर जावे लागते. आम्ही कुणाला फोन करणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस अधःपतनाचा काळ आहे याचे वाईट वाटते - पार्थ पवार, खासदार
06 Apr, 26 : 05:11 PM
LIVE: गोरेगावात दोन गटांत हाणामारी, पोलिसांची थेट आरोपींच्या घरावर बुलडोझर कारवाई
06 Apr, 26 : 04:51 PM
दिल्ली विधानसभा घुसखोरी प्रकरणातील आरोपीला बेड्या, कारही जप्त!
दिल्ली विधानसभेच्या व्हीआयपी गेटला धडक देऊन खळबळ उडवून देणाऱ्या आरोपीला अखेर दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी दुपारी घडलेल्या या नाट्यमय घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्या असून, गुन्ह्यात वापरलेली उत्तर प्रदेश पासिंगची कारही जप्त केली आहे.
06 Apr, 26 : 04:31 PM
काँग्रेसनं बारामती निवडणूक लढू नये, बावनकुळेंनी केली विनंती
बारामतीमध्ये काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवू नये ही विनंती आहे. सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे त्यांनी राहावं. अजित पवारांची जी जागा आहे ती वेगळी आहे. काँग्रेस पक्षाने अजित दादांचा विचार करावा. अजित पवारांच जीवन हे काँग्रेस पक्षाच्या सहवासात अनेक वर्ष गेले आहे. त्यांना काही संस्कृती पाळायची असेल तर त्यांनी लढू नये अशी मागणी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला केली.
06 Apr, 26 : 04:00 PM

06 Apr, 26 : 02:45 PM
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी
सोने आणि चांदीच्या किमतीत आज मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या तुलनेत चांदीचा दर ६ हजार रुपयांनी वाढला आहे. 'इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन'नं (IBJA) नवीन किमती जाहीर केल्या आहेत.
सोने आणि चांदीच्या किमतीत आज मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या तुलनेत चांदीचा दर ६ हजार रुपयांनी वाढला आहे. पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर?#gold#silver#investmenthttps://t.co/OUpNZPOQOk
— Lokmat (@lokmat) April 6, 2026
06 Apr, 26 : 02:35 PM
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या आक्रमक स्वभावामुळे पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडले आहेत. इराणविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेचा वापर केल्यामुळे ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतूनच टीकेची झोड उठली आहे. केवळ टीकाच नव्हे, तर आता त्यांना पदावरून हटवण्यासाठी अमेरिकन संविधानातील '२५ व्या घटना दुरुस्ती'चा (25th Amendment) आधार घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जर ही मागणी मान्य झाली, तर ट्रम्प यांना खुर्ची सोडावी लागेल आणि जेडी वेंस अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बनू शकतात.
06 Apr, 26 : 02:33 PM
रवींद्र चव्हाण व मंत्री विखे हे प्राजक्त तानपुरेंच्या कार्यालयात
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज (ता. ६) अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले आज जोरदार शक्तिप्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी या शक्तिप्रदर्शनात सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी राहुरीत पोहोचताच रवींद्र चव्हाण व राधाकृष्ण विखे पाटील तनपुरे यांच्या कार्यालयात गेले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
06 Apr, 26 : 12:19 PM
काँग्रेसनं बारामती निवडणूक लढू नये, बावनकुळेंनी केली विनंती
बारामतीमध्ये काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवू नये ही विनंती आहे. सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे त्यांनी राहावं. अजित पवारांची जी जागा आहे ती वेगळी आहे. काँग्रेस पक्षाने अजित दादांचा विचार करावा. अजित पवारांच जीवन हे काँग्रेस पक्षाच्या सहवासात अनेक वर्ष गेले आहे. त्यांना काही संस्कृती पाळायची असेल तर त्यांनी लढू नये अशी मागणी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला केली.
06 Apr, 26 : 12:18 PM
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला!
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाने आता अत्यंत भयंकर रूप धारण केले आहे. इराणनेइस्रायलमधील महत्त्वाचे शहर असलेल्या हायफावर रविवारी रात्री भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात एका मोठ्या अपार्टमेंटचा अर्धा भाग कोसळून दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण मध्य इस्रायलमध्ये धोक्याचे सायरन वाजत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
06 Apr, 26 : 12:09 PM
रवींद्र चव्हाण व मंत्री विखे हे प्राजक्त तानपुरेंच्या कार्यालयात
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज (ता. ६) अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले आज जोरदार शक्तिप्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी या शक्तिप्रदर्शनात सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी राहुरीत पोहोचताच रवींद्र चव्हाण व राधाकृष्ण विखे पाटील तनपुरे यांच्या कार्यालयात गेले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
06 Apr, 26 : 12:01 PM
अभिषेक बॅनर्जींचा आरोप
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणुकीत TMC वारंवार जिंकून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आली आहे, म्हणूनच केंद्र सरकारने येथील जनतेला उपाशी मारण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून राज्याची थकबाकी रोखून धरली आहे असं बॅनर्जी म्हणाले. वाचा सविस्तर
06 Apr, 26 : 11:43 AM
कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार; प्राजक्त तनपुरेंचे राहुरी पोटनिवडणुकीतून माघारीचे संकेत
"भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्व मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. ही जी चर्चा झाली त्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल. कार्यकर्त्यांचे काय मत आहे यावर आम्ही निर्णय घेऊ. आज राहुरी मतदारसंघाचा विषय आहे. या तालुक्याला बरीच वर्षे प्रतिनिधी नव्हता. त्यासंदर्भात विकास कामांचा जो बॅकलॉग आहे याबाबतच चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री याठिकाणी आले आणि त्यांनी विनंती केली आहे. विकासाच्या कामांना त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. यासंदर्भात मला माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल. अर्ज भरून तयार आहे पण एवढी मोठी माणसं आपल्याकडे येतात, ज्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर मला सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल," असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं.
06 Apr, 26 : 10:17 AM
लक्ष्मण हाकेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार
बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी काहीवेळ उरला असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण होके यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भेटीनंतर लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगितले. काही प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो. मात्र, मला राज्यातील वरिष्ठ नेतृत्वांचे फोन आले. त्यामुळे मी हा निर्णय घेतला, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
06 Apr, 26 : 10:13 AM
उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजितदादांच्या स्मृतीस्थळी
बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी उपमुख्ममंत्री सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांना ्अश्रू अनावर झाले होते. आज दुपारी १२.३० वाजता प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार अर्ज भरणार आहेत.
06 Apr, 26 : 10:13 AM
बारामती विधानसभा निवडणुकीतून लक्ष्मण हाके यांनी घेतली माघार
बारामती विधानसभा निवडणुकीतून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली आहे.